अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. हा चित्रपट मूळ मल्याळम चित्रपटाचा रिमेक आह, आणि याच्या पहिल्या भागालाही तितकाच उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ‘दृश्यम २’ पाहण्यासाठी प्रेक्षक बॉक्स ऑफिसवर गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सगळे शोजही हाऊसफूल जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या दिवसापासूनच ‘दृश्यम २’ ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरू आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची करत ‘दृश्यम २’ हा ‘ब्रह्मास्र’ नंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ‘दृश्यम २’ने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. याच निमित्ताने अजय देवगणने वाराणसीच्या काशी विश्वनाथच्या मंदिरात हजेरी लावली आहे.

एकूणच ‘दृश्यम २’चं घवघवीत यश आणि आगामी ‘भोला’ या चित्रपटासाठी अजय देवगण प्रार्थना करत असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगत आहेत. अजयचा हा फोटो बघून कित्येक चाहत्यांनी त्याला दृश्यमच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी त्याच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

या फोटोत अजय देवगण निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे, त्याच्या गळ्यात हार आहेत, कपाळावर त्रिपुंड आहे आणि अतिशय भक्तिभावाने अजय काशी विश्वनाथाची पूजा करत आहे. ही पोस्ट शेअर करताना अजयने लिहिलं, “खूप दिवसांनी काशी विश्वनाथचं दर्शन घ्यायची संधी मिळाली. हर हर महादेव.” ‘दृश्यम २’ने पहिल्याच विकेंएण्डला बॉक्स ऑफिसवर ६४.१७ कोटींचा गल्ला जमवला होता. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ‘दृश्यम २’ची जादू बॉक्स ऑफिसवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सात दिवसांत तब्बल १०४ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ajay devgn visits varanasi kashi vishwanath temple photos viral avn