‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांवर प्रश्न उपस्थित करीत, सोशल मीडियावर ‘आदिपुरुष’ चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. एवढेच नाही तर काही प्रेक्षकांनी चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयावरही प्रश्न उपस्थित केले आहे. सैफ अली खानने साकारलेली रावणाची भूमिका पाहून काही प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत.

हेही वाचा : “आधी लगीन कोंढाण्याचं, मग…” बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, संवाद ऐकून शिवप्रेमी भारावले

ज्या दिवशी ‘आदिपुरुष’चा पहिला फर्स्ट लुक समोर आला होता, त्या दिवसापासून लोकांनी सैफ अली खानच्या ‘रावणा’च्या भूमिकेला कडाडून विरोध केला होता. मात्र, चित्रपटात रावणाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक ओम राऊतची पहिली पसंती सैफ अली खान नव्हता हे तुम्हाला माहिती आहे का? ‘आदिपुरुष’मध्ये सैफला साईन करण्यापूर्वी या चित्रपटाची ऑफर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याला देण्यात आली होती, परंतु त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला.

हेही वाचा : “खिशात मोजकेच पैसे, उपाशीपोटी काम, लंगर खाऊन पोट भरलं” फर्जंद फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय प्रवास, म्हणाला…

ओम राऊतला नकार देणारा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अजय देवगण होता. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी अजय देवगणला रावणाची भूमिका साकारण्यासाठी संपर्क साधला होता, परंतु त्याने ही ऑफर स्वीकारली नाही. अभिनेत्याने व्यग्र वेळापत्रकाचे कारण देत रावणाची भूमिका नाकारली. सोशल मीडिया युजरने भूमिका नाकारली म्हणून अजयचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : ‘टिकू वेड्स शेरू’साठी अवनीत कौरला संधी का दिली? कंगना रणौतने स्पष्टच सांगतिले, म्हणाली “बॉलीवूडमध्ये पैशापेक्षा खरं टॅलेंट…”

‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अजय देवगण योग्य ठरला असता, असे अनेकांचे मत आहे. पण, अजयने घेतलेला हा निर्णय त्याच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे, कारण ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापासूनच व्हीएफएक्स, संवाद, कलाकारांची निवड यामुळे वादात सापडला आहे.