बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा आज ४८ वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर अक्षयने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टार किड असतानाही त्याला खूप संघर्ष करावा लागला. विनोद खन्ना यांची प्रचंड लोकप्रियता असूनही अक्षयला ते स्थान मिळाले नाही. मात्र, अद्याप अक्षयने लग्न केलेले नाही. एका मुलाखतीत अक्षयने लग्न न करण्यामागचे कारण सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video : शाहरुख खानने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, नंबर प्लेट आहे खास

एका मुलाखतीदरम्यान अक्षय खन्नाने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याने अद्याप कोणतेही नाते का जोडले नाही आणि आजपर्यंत त्याने लग्न का केले नाही हे सांगितले. अक्षयच्या म्हणण्यानुसार तो स्वतःला लग्नासाठी योग्य व्यक्ती म्हणून पाहत नाही. त्याच्या मते तो वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी बनला नाही. इतकंच नाही तर या विषयावर बोलताना अक्षय खन्ना पुढे म्हणाला की लग्न ही अशी गोष्ट आहे की सर्व काही बदलून टाकते. मला माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवायला आवडते. म्हणून, दुसरी कोणतीही व्यक्ती त्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवल्याचे त्याला आवडत नाही.

हेही वाचा- अर्जुन कपूरची बहीण ‘या’ व्यक्तीला करतेय डेट, बॉयफ्रेंडसह स्विमिंगपूलमधील ‘तो’ फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

अक्षय खन्नाने१९९७ मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्याने बॉर्डर, ताल, हंगामा, हलचूल, रेस, डहक, दिल चाहता है आणि तीस मार खान सारखे चित्रपट केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor akshay khanna reveals the reason behind staying unmarried dpj