Bhoot Bangla Release Date : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘भूत बंगला’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सप्टेंबर महिन्यात त्याने या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांच्या मनात हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याबाबत उत्सुकता आहे. अशात आता बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने ‘भूत बंगला’ चित्रपटाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. त्यात त्याने चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार याची माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाच्या शूटिंगबद्दल अपडेट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

अक्षयने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो एका बंगल्यावर हातात एक दिवा घेऊन बसला आहे. तसेच यावर चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची तारीख लिहिण्यात आली आहे. अभिनेत्याने यावर कॅप्शनमध्ये लिहिले, “माझे आवडते कलाकार प्रियदर्शन यांच्यासह काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आजपासून आम्ही ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करीत आहोत. हा भीती आणि हास्याचा दुहेरी डोस तुमच्यासाठी २ एप्रिल २०२६ ला तयार असेल. तोपर्यंत तुमच्या सदिच्छा सोबत असाव्यात.”

हेही वाचा : नितेश तिवारी यांच्या ‘रामायणचित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याआधी अक्षयने प्रियदर्शन यांच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटात काम केले आहे. त्याच्या या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र काम करणार असल्याने प्रेक्षकांच्या मनात ‘भूत बंगला’ पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

प्रियदर्शन दिग्दर्शित भूत बंगला या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता आर. कपूर, बालाजी मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स प्रॉडक्शन हाउसद्वारे होणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा आकाश ए. कौशिक यांनी लिहिली आहे. तसेच संवाद लेखन रोहन शंकर यांनी केलं आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटात अभिनेत्री वामिका गब्बीदेखील झळकणार आहे. चित्रपटात ती एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तसेच वामिकाचे पात्र चित्रपटातील हास्यकल्लोळ आणखी वाढणारे ठरणार आहे.

हेही वाचा : आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आजवर बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांवर आधारित त्याचे ‘पॅड मॅन’ व ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ‘भूत बंगला’ चित्रपटासह तो ‘हाऊलफूल ५’ व ‘हेराफेरी ३’ या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.