बॉलीवूडच्या खिलाडी कुमारचा लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बडे मियां छोटे मियां’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अक्षय टायगर श्रॉफबरोबर झळकणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याच सुपरस्टारसाठी अक्षयने त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा नियम मोडला होता. याचा किस्सा पृथ्वीराजने एका मुलाखतीमध्ये सांगितला.

अक्षय कुमार हा बॉलीवूडमधला एक शिस्तबद्ध अभिनेता आहे, हे सर्वश्रुत आहे. तो आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण लवकर संपवतो. जास्त दिवस चित्रीकरण करत नाही. पण हाच नियम अक्षयने दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसाठी मोडला होता. कारण अक्षयची इच्छा होती की, पृथ्वीराज ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटाचा भाग व्हावा.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

हेही वाचा – “L दाबला अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने सई ताम्हणकरला चुकून केला होता ‘हा’ मेसेज

पृथ्वीराजने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की,”‘सालार’ दिग्दर्शक प्रशांत नील यांना असं वाटत की, जेव्हा मी त्यांच्या चित्रपटाचा भाग असेल तेव्हाच ते चित्रपट करू शकतात. तसंच अली अब्बास जफर यांनाही असंच वाटत. त्यांनी मला ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटात काम करण्यासाठी तयार केलं. मला स्क्रिप्ट खूप छान वाटली. माझी चित्रपटातील भूमिका देखील दमदार आहे.”

पुढे पृथ्वीराज म्हणाला, “१० वर्षांनंतर हिंदी चित्रपट (सालार) काम केलं आहे. पण दुर्दैवाने या चित्रपटाची टक्कर दुसऱ्या हिंदी चित्रपटाबरोबर होत आहे. ज्याच्याशी माझी आधीच बांधिलकी होती. त्यानंतर मी अलीला सांगितलं, ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटात मी काम करेन असं मला वाटत नाही. कारण मी दुसरीकडे तारखा दिल्या होत्या. मनालीमध्ये याचं (सालार) चित्रीकरण सुरू होतं आणि अली लंडनमध्ये अक्षय कुमार-टायगरबरोबर चित्रीकरण करत होते. मोठ्या कलाकारांबरोबर तारखा जमवणं फार कठीण असतं. त्यामुळे मी अलीची माफी मागितली. कारण मला त्यांच्या चित्रीकरणाचं संपूर्ण वेळापत्रक बदलवायचं नव्हतं.”

हेही वाचा – आलिया भट्टच्या लेकीची एक-दोन नाही तर ‘एवढी’ आहेत टोपणं नावं; म्हणाली, “लॉलीपॉप…”

“पण मी जेव्हा रात्री उशीरा ‘सालार’ चित्रपटाचा क्लायमॅक्सचं चित्रीकरण करत होतो. यादरम्यान मला फोन आला आणि सांगितलं, अक्षय कुमारबरोबर बोलणं झालं आहे. आता चित्रीकरणासाठी कधी येऊ शकता सांगा. तेव्हा आपण चित्रीकरण करू. हा एक अतिशय कृतज्ञ अनुभव होता. कारण एखाद्या चित्रपट निर्मात्याला वाटत की, तुमचं चित्रपटात असणं फार महत्त्वाचं आहे. ज्यासाठी ते वेळापत्रकही बदलण्यास तयार होतात. त्यामुळे हा फोन माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता.”

दरम्यान, पृथ्वीराजच्या ‘सालार’ या चित्रपटाची शाहरुख खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘डंकी’ चित्रपटाशी टक्कर होणार आहे. सालारमध्ये प्रभासच्या जवळचा, खास मित्राच्या भूमिकेत पृथ्वीराज पाहायला मिळणार आहे.

Story img Loader