बॉलिवूडचा खिलाडी कुमार सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग स्कॉटलँडमध्ये सुरू आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. अ‍ॅक्शन सीन्स शूट करत असताना अक्षयला दुखापत होऊन तो जखमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षयने दुखापत झाल्यानंतरही शूटिंग बंद न करता चित्रपटातील पुढचे सीन्स चित्रीत केल्याची माहिती आहे. गंभीर दुखापत नसल्यामुळे अक्षयने शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. अक्षयच्या दुखापतीमुळे चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. सध्या खिलाडी कुमारचे चित्रपटातील अन्य सीन्स शूट करण्यात येत आहेत.

हेही वाचा>> आतिफ अस्लमला कन्यारत्न, रमजानच्या मुहूर्तावर शेअर केला पहिला फोटो, लेकीचं नाव ठेवलं…

हेही वाचा>>“गुडघे काळे पडलेत” शिवाली परबच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले “पैठणी ड्रेसची वाट…”

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील अक्षय कुमार टायगर श्रॉफ यांच्या एका अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग सुरू होतं. याचदरम्यान स्टंट करताना अक्षय कुमारला दुखापत झाली. अक्षयच्या गुडघ्याला ही दुखापत झाली असून त्याच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. स्कॉटलँडमधील चित्रपटाचं शूटिंग वेळेत पूर्ण करण्यासाठी अक्षयने दुखापत होऊनही शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा>>३० लाखांची गाडी घेतल्यानंतर ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने लाँच केला स्वतःचा ब्रँड, नावही आहे फारच खास

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात अक्षय कुमार व टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. याबरोबरच सोनाक्षी सिन्हा व पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor akshay kumar gets injured during shooting action scene for bade miyan chote miyan movie in scotland kak