बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार सातत्याने चर्चेत येत असतो. नुकताच त्याचा ‘मिशन रानीगंज’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला आपली जादू दाखवता आली नाही. चित्रपटांप्रमाणेच एका मुद्द्यावरून त्याच्यावर बरीच टीका होते तो मुद्दा म्हणजे कॅनडाचे नागरिकत्व. १५ ऑगस्टला अक्षयला भारतीय नागरिकत्व मिळालं आहे. सततच्या फ्लॉप चित्रपटामुळे अक्षय भारत सोडून पुन्हा कॅनडात स्थायिक होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान अक्षयने नुकतंच एका मुलाखतीत कॅनडाच्या नागरिकत्वावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा- राजकारणात प्रवेश करणार का? अक्षय कुमार उत्तर देताना म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने…”
‘टाईम्स नाऊ नवभारत’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावरुन होणाऱ्या टीकेवर मौन सोडलं आहे. अक्षय म्हणाला, “९० च्या काळात माझे चित्रपट चालत नव्हते. त्यावेळी मला कॅनडात व्यवसाय करण्याची संधी मिळाली म्हणून मी तिथे गेलो. यादरम्यान माझे १-२ चित्रपट सुपरहिट झाले आणि मी परत भारतात आलो.”
अक्षय पुढे म्हणाला, ‘माझे हृदय भारतीय आहे. कॅनेडियन नागरिक असूनही मी माझे सर्व कर भरतो. मी सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक आहे. मी भारतात राहतो. इथेच काम करतो. ८ ते ९ वर्षांपूर्वी मी शेवटचा कॅनडाला गेलो होतो. मी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. पण लॉकडाऊन लागलं आणि भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी मला दीड वर्ष लागली. योगायोगाने मला १५ ऑगस्टलाच भारतीय नागरिकत्व मिळालं.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ६ ऑक्टोबर त्याचा ‘मिशन रानीगंज’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर परिणीती चोप्राची मुख्य भूमिका आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही. चार दिवसात चार दिवसात १४.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.