बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता अक्षय कुमारच्या नावाचा कायमच समावेश असतो. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता अक्षय कुमारने स्वत:चा एक जुना फोटो शेअर केला आहे.
अक्षय कुमार हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच अक्षयने त्याचा एक जुना फोटो शेअर केला होता. या फोटोद्वारे त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अक्षयने शेअर केलेला हा फोटो २३ वर्षांचा असताना काढलेला आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : लेदरचं जॅकेट, हातात बंदूक अन्…; विशाखा सुभेदार पुन्हा झळकणार बेधडक अंदाजात, फोटो पाहिलात का?
“तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या सर्वच गोष्टी कायमच खास असतात. त्याचप्रमाणे माझ्यासाठी हा फोटोही खूप खास आहे. हा फोटो काढला त्यावेळी मी २३ वर्षांचा होतो आणि कॅमेऱ्यासमोर फोटो काढण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे मला हे कळण्याआधीच कॅमेरा हे माझे पहिले प्रेम झाले होते”, असे कॅप्शन अक्षयने या फोटोला दिले आहे.
अक्षय कुमारचा हा फोटो पाहून त्याचे चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. यातील अनेकांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या फोटोवर ‘जुनं ते सोनं’ असं म्हणत कमेंट केली आहे.
आणखी वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…
दरम्यान अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर परिणीती चोप्रा झळकली. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असेल. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त अजय देवगण, करीना कपूर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत.