बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘बड़े मियां छोटे मियां’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला अक्षयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. ‘बड़े मियां छोटे मियां’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अक्षयसह अभिनेता टायगर श्रॉफ झळकला आहे. अशातच एका मुलाखतीमधून अक्षयने पहिली नोकरी व पहिल्या पगारविषयी खुलासा केला आहे.
‘बड़े मियां छोटे मियां’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय व टायगरने ‘कर्ली टेल्स’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अक्षयला त्याच्या पहिल्या पगाराविषयी विचारण्यात आलं. तेव्हा अक्षय म्हणाला की, मी १५, १६ वर्षांचा होता, तेव्हा मी कोलकातामधील ट्रॅव्हल एजन्सीमध्ये पहिली नोकरी केली होती. तिथे ऑफिस बॉयचं काम करायचो. या नोकरीचे मला १५० ते २०० रुपये मिळायचे.
त्यानंतर अभिनेत्याला विचारलं, कमवायची एवढी घाई का होती? यावर अक्षय म्हणाला, “जेव्हा माणूस शिकलेला नसतो, तेव्हा तो कोणतीही नोकरी करणारच ना. ही एकमेव नोकरी होती, जी मला लगेच मिळाली होती. त्यानंतर मी ढाकाला गेलो. तिथल्या एका हॉटेलमध्ये काम केलं. मग मी बँकॉकला गेलो.”
पुढे अक्षय म्हणाला, “काही दिवसांनंतर बँकॉकहून दिल्लीला आलो. तिथे काम केलं. तेव्हा मी खोटे दागिने विकायचो. दिल्लीतून घेऊन मुंबईत विकायचो. दिल्लीतून २० हजाराचे दागिने खरेदी केले तर मुंबईत येऊन २४ हजाराला विकायचो.”
हेही वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने पहिला गुढीपाडवा ‘या’ ठिकाणी केला साजरा, फोटो शेअर करत गायिका म्हणाली…
दरम्यान, अक्षयला पहिल्या चित्रपटाचं पाच हजार मानधन मिळालं होतं. त्यानंतर अक्षयला दुसऱ्या चित्रपटासाठी ५० हजार आणि तिसऱ्या चित्रपटासाठी १.५० लाख मानधन मिळालं होतं.