पाकिस्तान बरोबरच्या विजयानंतर आता आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज देशातूनच नव्हे तर जगभरातुन ऋषी सुनक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटनवरून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे, ‘भारत माता की जय! आता अखेर ब्रिटनमध्ये मातृ देशाचा पंतप्रधान म्हणून नवा व्हाईसरॉय आला आहे.’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

क्रांती रेडकरच्या घरी ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिली भेट, फोटो व्हायरल

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीदेखील ‘ब्रिटनच्या पहिल्या हिंदू पंतप्रधानांना शुभेच्छा’ असा कॅप्शन देत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऋषी सुनक यांच्या आई-वडिलांनी पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतर केलं होतं. ते दोघेही भारतीय वंशाचे आहेत. सुनक यांचा जन्म १९८० साली इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये झाला. २०१५ साली सुनक पहिल्यांदा उत्तर यॉर्कशायरमधील रिचमंड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

ऋषी सुनक यांचे भारताशी आणखीन एक नाते आहे ते म्हणजे भारताचे ते जावई आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गद आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता ऋषी सुनक यांची पत्नी आहे. नारायण मूर्ती यांनी जावयाचे कौतूक केले आहे तसेच शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor amitabh bacchan congratulating first indian origin rushi sunak new prime minister of britan spg