अमिताभ बच्चन बोमन इराणी, डॅनी डेंग्झोपा, अनुपम खेर या दिग्गज कलाकारांनी भरलेल्या ‘उंचाई’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. याच चित्रपटातील मैत्रीवर आधारित एक गाणे प्रदर्शित झाले आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तसेच आता हे गाणे यूट्यूबवर देखील प्रसारित झाले आहे.

या गाण्यात हे चार दिग्गज कलाकार दिसत आहेत. एका पार्टीतले हे गाणे आहे. यात चौघे थिरकताना दिसत आहेत. हे गाणे नकाश अझीझने गायले असून प्रख्यात गीतकार इर्शाद कामिलने लिहले आहे. तर तरुणाईचा लाडका अमित त्रिवेदी यांने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात या दिग्गज अभिनेत्यांच्या बरोबरीने अभिनेत्री नीना गुप्ता, सारिका परिणीती चोप्रा यांचादेखील मुख्य भूमिका आहेत.

२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला दिलासा! न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

कौंटुबिक चित्रपटांची निर्मिती करणे ही प्रामुख्याने राजश्री प्रॉडक्शनची खासियत असून आतापर्यंत ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन?’, ‘विवाह’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनने केली आहे.दिग्दर्शक सूरज बडजात्या या चित्रपटाच्या निमित्ताने ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतले आहेत.

११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. या ४ पैकी एका मित्राचं निधन होतं, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचं ठरवतात. असं एकंदर या चित्रपटाचा ट्रेलर बघून अंदाज येत आहे

Story img Loader