बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून अनिल कपूर यांना ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. ते सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. मात्र आता अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

अनिल कपूर हे इन्स्टाग्रामवर सक्रीय असतात. ते सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी शेअर करत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर ५.८ मिलियन फॉलोवर्स आहेत. मात्र आता अचानक अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यांनी त्यांचा प्रोफाईल फोटोही डिलीट केला आहे. तसेच बायोही काढून टाकला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

anil kapoor instagram
अनिल कपूर

अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्ट हटवल्यानंतर त्यावर आता अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. यातील काहींनी अनिल कपूर यांनी सोशल मीडियातून ब्रेक घेतला असावा, अशी कमेंट केली आहे. तर काहींनी त्यांची ही प्रमोशन स्ट्रॅटजी आहे, असे म्हटले आहे. मात्र त्यांनी इन्स्टाग्रामवरील या पोस्ट का हटवल्या याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

दरम्यान अनिल कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते ‘थँक्स फॉर कमिंग’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट त्यांचा जावई करण बुलानी यांनी दिग्दर्शित केला होता. तसेच लवकरच ते रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहेत.