बॉलिवूडमध्ये अनिल कपूर यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. कित्येक तरुणांना लाजवेल असा अनिल कपूर यांचा फिटनेस आहे आणि त्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. त्यामुळेच आजही त्यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळतात. या वयातही केवळ चरित्र अभिनेता म्हणून एका चौकटीत न अडकता अनिल कपूर यांनी व्यावसायिक चित्रपट आणि समांतर चित्रपट यांच्यात अगदी योग्य समतोल साधला आहे.

याचवर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा ‘जुगजुग जियो’ हा चित्रपट चांगलाच गाजला. शिवाय नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘थार’ या चित्रपटातील त्यांच्या हटके भूमिकेचं कौतुक झालं. नुकतंच त्यांनी ‘पिंकव्हीला’ने आयोजित केलेल्या राऊंडटेबल संभाषणामध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी खुलासा केला.

Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Shashank Ketkar
“इतकं करूनही शेवटी…”, अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मागच्या १४ वर्षांत…”
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Marathi Actress tejashri Pradhan want to again play rj role in asehi ekda vhave movie
तेजश्री प्रधानला ‘ही’ भूमिका पुन्हा एकदा जगायला आवडेल, म्हणाली, “तेव्हा मला…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

आणखी वाचा : “RRR हा चित्रपट म्हणजे…” रत्ना पाठक यांचं राजामौलींच्या चित्रपटाबाबत केलेलं विधान चर्चेत

या मुलाखतीमध्ये अनिल कपूर यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. शिवाय त्यांनी ‘कांतारा’ या चित्रपटाची प्रशंसा केली. इतकंच नाही तर त्यांनी या चित्रपटाचा नायक आणि अभिनेता रिषभ शेट्टीबरोबर काम करायची इच्छा व्यक्त केली. याबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले, “रिषभ मित्रा, पुढचा चित्रपट माझ्याबरोबर बनव.”

‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे. बॉलिवूडकरांनीही या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हळूहळू वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करण्यात आलं आणि मग या १६ कोटीचं बजेट असलेल्या चित्रपटाने तब्बल ४०० कोटीहून अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली आणि एक वेगळा इतिहास रचला.

Story img Loader