देशभरात गेल्या काही दिवसांपासून ५४३ लोकसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होती. आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली असून बऱ्याच मतदारसंघातील निकाल जाहीर झाले आहेत. बॉलीवूडची धाकड गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौत यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा २०२४च्या निवडणुकीत कंगना रणौत भाजपाच्या तिकीटावरून मंडी मतदारसंघाच्या रिंगणात उतरल्या होत्या. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा कंगना यांनी पराभव केला आहे. कंगना रणौत यांना ५ लाख १४ हजारांहून अधिक मतं मिळाली असून विक्रमादित्य यांना ४ लाख ४२ हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे ७२ हजारांहून अधिक मतांच्या फरकांनी कंगना विजयी झाल्या आहेत. याच निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – रोहित शेट्टीबरोबर पंगा घेणं असिम रियाजला पडलं महाग, थेट ‘खतरों के खिलाडी १४’मधून केलं बाहेर, वाचा संपूर्ण प्रकरण

कंगना यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत अभिनेते अनुपम खेर यांनी खास पोस्ट लिहिली आहे. कंगना यांचा व्हिडीओ शेअर करत अनुपम यांनी लिहिलं आहे, “माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करून कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकत. जय हो.”

हेही वाचा – Video: अरे बापरे! संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरचं झालं अपहरण, नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

अनुपम खेर यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भारतातील सर्वोत्कृष्ट पक्ष भाजपा आहे”, “कंगना खूप मेहनती आहे आणि ती जोखीम घेण्यास घाबरत नाही”, “बॉलीवूडची शेरनी खासदार कंगना रणौत आहे”, “फिर एक बार मोदी सरकार”, “अभिनंदन”, अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी अनुपम खेर यांच्या पोस्ट केल्या आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर कंगना यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, कंगना यांची ही पहिलीच निवडणूक होती; जी त्यांनी जिंकली आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना म्हणाल्या, “आमचे नेते नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढवली आहे. मोदींवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. मंडीचं भविष्य आता उज्ज्वल असणार आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor anupam kher congratulations post for kangana ranaut after won lok sabha election 2024 pps