बॉलिवूडमधील अनुपम खेर हे चर्चेत असतात. सोशल मीडियावरदेखील ते कायम सक्रिय असतात. अभिनेते अनुपम खेर हे अत्यंत दिलखुलास आणि मनमोकळे आहेत, याची प्रचिती अनेकदा प्रेक्षकांना आली आहे. विविध पोस्टच्या माध्यमातून ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी शेअर करत असतात. मध्यंतरी त्यांनी बॅडमिंटन चॅम्पियन पी व्ही सिंधूच्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती. आता त्यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आहे
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिला आहे ‘काही दिवसांपूर्वी तुम्हाला दिल्लीत भेटून आनंद झाला. तुमच्या आदरातिथ्याबद्दल धन्यवाद. तुमचे उत्तम कार्य असेच सुरु ठेवा. जय हो’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बॉलिवूडच्या तीन खानपैकी कोण आवडतो? कतरिना कैफ म्हणाली, “चित्रपटाच्या सेटवर.. “
अनुराग ठाकूर मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल आणि शीला देवी यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सध्या ते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहेत.
अनुपम खेर यांचा ऊंचाई चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अनुपम खेर यांच्या पाठोपाठ अमिताभ बच्चन यांचाही या चित्रपटातील लूक समोर आला होता.२ मिनिटं ५० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये या चित्रपटसृष्टीत मुरलेले कलाकार आणि त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. दिग्दर्शक सुरज बडजात्या हे बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहेत