अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या अभिनयाबरोबच बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर ते त्यांचे राजकीय तसेच सामाजिक विचार मांडत असतात. गेली कित्येक वर्षं अनुपम हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. सिमला ते मुंबई हा प्रवास आणि या प्रवासात झालेलं अभिनयाचं प्रशिक्षण आणि चित्रपटसृष्टीतील अनुभव याविषयी अनुपम खेर यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात अनुपम खेर यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल गप्पा मारल्या. तसंच मुंबईविषयी त्यांना काय वाटतं याबद्दलही अनुपम खेर यांनी त्यांचं मत मांडलं. या मुलाखतीमध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेत शिकताना एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून काय शिकायला मिळालं याविषयी अनुपम खेर यांनी या खुलासा केला.

आणखी वाचा : ‘या’ मराठी मुलीशी करायचं होतं अमिताभ बच्चन यांना लग्न; अभिनयाच्या प्रेमापोटी ते मुंबईत आले अन्…

एनएसडी आणि तिथल्या अनुभवाबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले, “एनएसडी ने मला एक उत्तम माणूस बनवलं. जगायचं कसं किंवा कोणत्याही परिस्थितीशी झगडायचं कसं हे मला एनएसडीमधून शिकायला मिळालं. प्रत्येक संस्थेतून हेच शिकवलं जातं पण एनएसडी ही संस्था अभिनयाशी जोडली असल्याने त्यात मानवी भावनांचा जास्त सहभाग असतो. त्यामुळे आयुष्यात हार न मानता कसं येईल त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे मला एनएसडीने शिकवलं.”

इतकंच नाही तर ‘एनएसडी’मधून बाहेर पडताना नातेसंबंधाबद्दलही बरंच शिकता आलं हेदेखील अनुपम यांनी सांगितलं. ते म्हणाले, “एनएसडीने नाती कशी जोडायची, टिकवायची, वाढवायची शिकवलं. माझं पहिलं सीरियस रिलेशनशीप हे एनएसडीने दिलं. त्यातूनच मी बऱ्याच गोष्टी शिकलो. नात्यातले उतार चढाव काय असतात आणि त्या नात्याला कसं जपलं पाहिजे या गोष्टीदेखील मी एनएसडीमधूनच शिकलो.”

अनुपम खेर यांनी ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात काम केलं. यातील त्यांची भूमिका आणि त्यांच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली. नुकताचा अनुपम यांचा अमिताभ बच्चन आणि बोमन इराणीबरोबरचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटालाही उदंड प्रतिसाद दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor anupam kher speaks about lessons he learned in national school of drama avn