चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे सतीश यांचे कुटुंबियही कोलमडून गेले आहेत. दरम्यान सतीश यांचे सगळ्यात जवळचे मित्र व सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनाही मित्राच्या निधनामुळे दुःखद धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते अनुपम खेर हे भावूक पोस्ट करताना दिसत आहे. नुकतंच त्यांच्या एका ट्वीटने लक्ष वेधून घेतलं आहे.
अनुपम खेर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. गेल्या काही दिवसांपासून ते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
आणखी वाचा : “हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड चांगले” शाहरुखच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियांका चोप्राचा संताप, म्हणाली “डोक्यात हवा…”
“जीवन हे आरशाप्रमाणे आहे. हे तेव्हाच हसेल जेव्हा तुम्ही हसाल”, अशा आशयाचे एक ट्वीट अनुपम खेर यांनी केले आहे. त्यांनी हिंदीत हे ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे ते अजूनही सतीश कौशिक यांच्या निधनातून सावरले नसल्याचे दिसत आहे.
अनुपम खेर यांच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही बरोबर बोलताय, अगदी बरोबर, अशा अनेक कमेंट या ट्वीटवर पाहायला मिळत आहेत. दरम्यान अनुपम खेर बॉलिवूडमधील एक जेष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. गेल्यावर्षी ते काश्मीर फाइल्स या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते.