बॉलिवूडमधील जोडप्यांच्या प्रेमाच्या गोष्टी जशा प्रसिद्ध आहेत, तशा एकमेकांपासून वेगळं होण्याच्या गोष्टीदेखील आहेत. हृतिक रोशन सुझान, सैफ अली खान अमृता सिंग त्याचप्रमाणे एक नाव कायम चर्चेत असते ते म्हणजे अरबाज खान मलायका अरोरा. या दोघांनी १८ वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेतला. घटस्फोट झाल्यानंतरदेखील ते एकमेकांच्या संपर्कात असतात.

अरबाजने एका मुलाखतीत सांगितलं की “मी आणि मलायका पहिल्यापेक्षा आता एकमेकांना समजू लागलो आहोत.” सिद्धार्थ काननबरोबर बोलताना अरबाज म्हणाला की, ते एकमेकांच्या निवडीचे कौतुक करतात. “गेल्या काही वर्षांत आम्ही खूप परिपक्व झालो आहोत. आता आम्हा दोघांनी एकमेकांना पूर्वीपेक्षा जास्त समजून घ्यायला आणि स्वीकारायला सुरुवात केली आहे. आम्ही दोघे आमच्या आयुष्यात पुढे निघून गेलो आहोत. आमच्या आयुष्यातील गोष्टींना आम्ही स्वीकारण्यास सुरवात केली आहे. माझ्याबाबतीतील काही गोष्टी आहेत ज्या मालयकाने स्वीकारल्या आहेत तर मलायकच्या काही गोष्टी मी स्वीकारल्या आहेत.”

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!

आलियाला मिळाला डिस्चार्ज; पती रणबीर अन् लेकीसह रुग्णालयातून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

मलायकानेदेखील घटस्फोटानंतर एका मुलाखतीत सांगितले होते “आता आमच्यात चांगले संबंध आहेत. आम्ही दोघंही बऱ्यापैकी समजूतदार आहोत. आम्ही खूश आहोत. पूर्वीपेक्षा शांत आहोत. अरबाज एक चांगला व्यक्ती आहे. माझी इच्छा आहे की, त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व सुख मिळो.” अशी तिने प्रतिक्रिया दिली होती.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं लग्न डिसेंबर १९९८ मध्ये झालं होतं. त्यानंतर १८ वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये दोघंही घटस्फोट घेत वेगळे झाले होते. अरबाज खान जॉर्जिया एड्रियानीला डेट करू लागल्यानंतर मलायका आणि त्याच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान खान आता १९ वर्षांचा आहे. तर सध्या मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहेत.

Story img Loader