अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अरबाज खान सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ५६ वर्षांच्या अरबाजने २४ डिसेंबरला मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधली. अरबाजची बहीण अर्पिताच्या घरी हा लग्नसोहळा झाला. या लग्नाचा गाजावाजा न करता मोजक्या पाहुण्यांमध्ये खान कुटुंबीयांनी अरबाजचं दुसरं लग्न उरकलं. मलायकानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. पण त्याचा जॉर्जियाबरोबर कधी ब्रेकअप झाला अन् शुरा त्याच्या आयुष्यात कधी आली याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज खानच्या लग्नाच्या २ दिवसांनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया तिच्या घराबाहेर पाहायला मिळाली. डोळ्यांवर गॉगल, हातात कुत्रा घेऊन जॉर्जिया दिसली. अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला. जॉर्जियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: “भावाची वरात…”, सारंग साठ्येने शेअर केले गौतमी-स्वानंदच्या लग्नातील न पाहिलेले क्षण, म्हणाला, “४ आण्याची पेप्सी…”

अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ही बिचारी कुत्र्यालाच फिरवत बसली.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अरबाजची बातमी ऐकून खूपच रडली आहे वाटतं. त्यामुळेच संध्याकाळी देखील गॉगल लावला आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तू कुत्रा फिरवत राहिलीस आणि त्याला (अरबाज) कोणीतरी दुसरंच येऊन घेऊन गेलं.”

दरम्यान, अरबाज खानचं पहिलं लग्न मलायका अरोराबरोबर १९९८ साली झालं होतं. १९ वर्षांचा संसार केल्यानंतर अरबाज आणि मलायका विभक्त झाले. यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिला बराच काळ डेट करत होता. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण काही काळानंतर अरबाज शुराला डेट करू लागला. दोघांची मैत्री  ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि काल दोघं लग्नबंधनात अडकले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor arbaaz khan ex girlfriend giorgia andriani spotted after two days of his wedding video goes viral pps