बॉलीवूडच्या भाईजानचा भाऊ अरबाज खान २४ डिसेंबरला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. ५६व्या वर्षीय अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधली. बहीण अर्पिता खानच्या घरी मोजके पाहुणे आणि कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अरबाज-शुराचा लग्नसोहळा पार पडला. नुकतेच दोघं हनिमूनला गेले आहेत. अशातच लग्नाच्या एका आठवड्यानंतर अरबाजची पत्नी शुराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अरबाज तिला फिल्मी स्टाइलमध्ये पप्रोज करताना दिसत आहे.

शुरा खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज गुडघ्यावर बसून भलामोठा पुष्पगुच्छ देऊन प्रपोज करताना दिसत आहे. यावेळी अरबाजचा २१ वर्षांचा मुलगा अरहान खान, बहीण अर्पिता खान, आयुष शर्मा आणि इतर मित्रमंडळी देखील उपस्थित होते. अरबाज पुष्पगुच्छ देऊन शुराला लग्नासाठी विचारताना दिसत आहे.

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Praveen Trade
Mahakumbh 2025: “अद्भुत अनुभव…”, प्रवीण तरडेंची पत्नीसह महाकुंभमेळ्याला हजेरी; व्हिडीओ केला शेअर, नेटकरी कौतुक करीत म्हणाले…
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…
rakhi sawant maarige to dodo khan pakistani
राखी सावंत ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीबरोबर करणार तिसरं लग्न? विवाहाचे प्लॅन्स सांगत अभिनेत्री म्हणाली, “इस्लामिक पद्धतीने…”
Kanyadaan Fame Marathi Actor Wedding
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा! पत्नीचं सिनेविश्वाशी आहे खास कनेक्शन, पाहा फोटो
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

हेही वाचा – Video: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी नवं वर्षाचं ‘असं’ केलं स्वागत, अभिनेत्री म्हणाली, “सर्व काही…”

त्यानंतर अर्पिता पुष्पगुच्छातील अंगठी शोधताना पाहायला मिळत आहे. मग अरबाज शुराला अंगठी घालताना दिसत आहे. अरबाजने फिल्मी स्टाइलमध्ये केलेलं प्रपोज पाहून शुरा लाजते आणि त्याला मिठी मारते. शुराने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “१९ डिसेंबरला होकार देण्यापासून ते २५ डिसेंबरला लग्न करेपर्यंत. सर्वकाही झटपट झालं.”

शुराने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अरबाजने देखील प्रतिक्रिया दिली आहे. अरबाज म्हणाला, “गुडघ्यावर बसल्यावर मला खूप भारी वाटत होतं.”

हेही वाचा – शिव ठाकरेने मुंबईत घेतलं आलिशान घर, ‘झलक दिखला जा सीझन ११’मध्ये केला खुलासा, म्हणाला, “मला वाटायचं…”

दरम्यान, अरबाज खानचं पहिलं लग्न मलायका अरोराबरोबर १९९८ साली झालं होतं. १९ वर्षांचा संसार केल्यानंतर अरबाज आणि मलायका विभक्त झाले. यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिला बराच काळ डेट करत होता. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण काही काळानंतर अरबाज शुराला डेट करू लागला. दोघांची मैत्री एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि २५ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले.

Story img Loader