भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या चर्चेत आहे. पाकिस्तान बरोबरच्या सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याचे कौतुक होत आहे. मात्र त्याला एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी विराट कोहलीच्या रुममध्ये जाऊन व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे विराट कोहली संतापला असून, त्याने इन्स्टावर पोस्ट टाकून आपली नाराजी जाहीर केली आहे. पोस्टवर बॉलिवूडकरांनीदेखील आपली मतं व्यक्त केली आहेत.
नेमकं घडलं काय?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामला एक मोठी पोस्ट शेअर केली असून संताप व्यक्त केला आहे. एखाद्याच्या गोपनीयतेचा आपण सन्मान करायला हवा, मनोरंजनासाठी कोणाचाही वस्तू म्हणून वापर होऊ नये असं विराट कोहलीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेता वरुण धवनपासून ते परिणीती चोप्रापर्यांत सगळेच सेलिब्रेटी कंमेंट करत आहेत. अभिनेता अर्जुन कपूरनेदेखील पोस्टवर कॉमेंट करत म्हणाला ‘पूर्णपणे अनैतिक’ अशा शब्दात त्याने व्यक्त केल्या. विराटबद्दल झालेल्या या घटनेवरून आता लोक अर्जुनला ट्रोल करत आहेत. एकाने लिहले आहे, ‘तुझी मजा आहे तुझे कोणी चाहतेदेखील नाहीत व्हिडीओ कोण काढणार?’ तर दुसऱ्याने लिहले आहे ‘हा व्हिडीओ तूच केला असशील’ असा आरोप थेट केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणारा विराट कोहली सध्या आपल्या संघासह पर्थमधील क्राऊन टॉवर्स हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. विराट कोहली रुममध्ये नसताना हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी आतमध्ये येऊन व्हिडीओ शूट केलं. यावेळी विराटचे कपडे, सामानालाही त्यांनी हात लावला. यानंतर त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.