बॉलीवूडसाठी अफेअर, ब्रेकअप, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी नवीन नाहीत. आतापर्यंत अनेक स्टार्सचे घटस्फोट झाले आहेत. सेलिब्रिटींचे घटस्फोट सहसा विवाहबाह्य संबंध किंवा, परस्पर मतभेदांमुळे होतात. पण एका बॉलीवूड अभिनेत्याच्या घटस्फोटाचं कारण अजबच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या अभिनेत्याचा घटस्फोट त्याच्या पाळीव कुत्र्यांमुळे झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोघांनी प्रेम विवाह केला होता, पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अवघ्या तीन वर्षांत हे दोघेही वेगळे झाले. हा अभिनेता म्हणजे अरुणोदय सिंग होय. अरुणोदयने १३ डिसेंबर २०१६ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. कॅनडाच्या ली एल्टनशी भव्य सोहळ्यात अरुणोदयने लग्नगाठ बांधली होती, पण अवघ्या तीन वर्षांत त्याचा संसार मोडला.

२०१९ मध्ये अरुणोदय व ली एल्टन यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचं कारण अरुणोदयचं प्राणीप्रेम ठरलं होतं. अरुणोदयला कुत्रे पाळण्याची खूप आवड आहे. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर कुत्र्यांबरोबरचे त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात. लग्नानंतर ली एल्टनला कुत्र्यांच्या आवाजाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे या जोडप्यात कुरबूर होऊ लागली.

कुत्रे सतत भुंकायचे, त्यामुळे ली एल्टनला त्रास होऊ लागला. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले आणि अरुणोदय व ली एल्टन यांच्यातील तणाव वाढला. दोघांचा वाद इतका वाढला की त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांनी कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांनी २०१९ मध्ये या जोडप्याचं नातं संपलं.

अरुणोदयचा घटस्फोट होऊन सहा वर्षे झाली आहेत, पण त्याने दुसरे लग्न केले नाही. आता अरुणोदय ४२ वर्षांचा आहे. तो सिंगल आहे आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळतो.

अरुणोदय सिंगचे करिअर

अरुणोदय सिंगच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास २००९ मध्ये ‘सिकंदर’मधून डेब्यू केल्यानंतर त्याने ‘जिस्म २’, ‘मैं तेरा हीरो’, ‘मिस्टर एक्स, ब्लॅकमेल व मोहेनजोदडो या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या; मात्र, त्याला बॉलीवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला नाही. त्याने ओटीटीवरही काम केलं आहे. ‘अपहरण’ या वेब सीरिजमधील कामासाठी अरुणोदय सिंगचं फार कौतुक झालं होतं. तो येत्या काळात ‘श्रीमान’ चित्रपटात दिसणार आहे.