आवड अन् ग्लॅमर इंडस्ट्रीतील आकर्षणामुळे अनेक जण मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मायानगरी मुंबईत येतात. काहींना संघर्षानंतर यश मिळतं आणि ते या क्षेत्रात टिकून राहतात, तर काही मात्र या झगमगाटात हरवून जातात आणि नंतर इंडस्ट्री सोडून देतात. असाच एक अभिनेता होता, ज्याने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रसिद्धी अन् यश दोन्ही मिळवलं. कालांतराने तो अभिनयाकडे वळला, पण तिथं त्याला हवं तसं यश मिळालं नाही. एकवेळ अशी आली की त्याने या क्षेत्राला अलविदा केलं.
या अभिनेत्याने मॉडेलिंगच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. नंतर तो अभिनय क्षेत्रात आला. इथेही त्याने मोजकेच सिनेमे केलेत असं नाही. त्याने जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. किंबहुना त्याचे सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले. त्याने टीव्ही शोही केले पण कदाचित यश त्याच्या नशिबातच नव्हते.
मॉडेल म्हणून केलेली करिअरला सुरुवात
या अभिनेत्याचे नाव आर्यन वैद (Arayn Vaid) आहे. आर्यनचा जन्म ४ जुलै १९७६ रोजी झाला. मॉडेल म्हणून तो खूप यशस्वी ठरला. त्याने २००० मध्ये ग्रॅव्हिएरा मिस्टर इंडिया वर्ल्ड मॉडेलिंग स्पर्धाही जिंकली होती. आर्यन वैदने त्याच वर्षी मिस्टर इंटरनॅशनल अवॉर्डही जिंकला. मॉडेल म्हणून त्याचे करिअर प्रचंड यशस्वी राहिले. २००६ मध्ये त्याने बिग बॉसमध्ये भाग घेतला आणि खूप लोकप्रियता मिळवली.
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव
एक-दोन नाही तब्बल ‘इतके’ चित्रपट झाले फ्लॉप
आर्यन वैदने ‘मार्केट’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात आर्यन वैदबरोबर अभिनेत्री मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर आर्यन वैदने दिया मिर्झासह ‘नाम गुम जायेगा’ या चित्रपटातही काम केलं. पण हा चित्रपटही चालला नाही. एकंदरीत आर्यन वैदने बॉलीवूडमध्ये जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केले. त्याने सनी देओल, बॉबी देओल आणि बिपाश बासू यांसारख्या सुपरस्टार्ससह काम केले. पण आर्यन वैदचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.
“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव
चित्रपट झाले फ्लॉप, टीव्हीवरही अपयश
अभिनेता आर्यन वैदने काही लोकप्रिय टीव्ही शोमध्येही काम केलं पण त्याला तिथेही यश आलं नाही. एक यशस्वी मॉडेल असलेला आर्यन अभिनय क्षेत्रात फ्लॉप ठरला. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्राला अलविदा केलं.
२००८ मध्ये आर्यन वैदने अमेरिकन फोटोग्राफर अलेक्झांड्राशी लग्न केलं. त्याने लग्नानंतर बॉलीवूड कायमचे सोडले. त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टनुसार तो अमेरिकेत राहत असल्याचं कळतं. पण सध्या आर्यन वैद काय करतोय याबाबत माहिती उपलब्ध नाही.