सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे बरेच चर्चेत आहेत. गुरुवारी (२५ मे) आशिष दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चा रंगल्या. वयाच्या ६०व्या वर्षी लग्न केल्यामुळे त्यांना ट्रोलही करण्यात येत आहे. याचसंदर्भात आशिष यांनी फेसबुकद्वारे एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष विद्यार्थी यांनी फेसबुकद्वारे व्हिडीओ शेअर करत पहिल्या पत्नीशी घटस्फोट, लग्न, वय व लव्हस्टोरी याबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे. तसेच सतत आशिष यांचं वय ६० वर्ष आहे असं बोललं जात आहे. पण त्यांचं वय नेमकं किती याबाबतही त्यांनी खुलासा केला आहे. त्यांचं खरं वय समोर आलं आहे.

आणखी वाचा – साध्या पद्धतीने लग्न पण दत्तू मोरेचं रिसेप्शन थाटामाटात पार, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी लावली हजेरी

पुन्हा लग्न करण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतला. याबाबत त्यांना कोणतीच खंत नाही असंही आशिष यांचं म्हणणं आहे. शिवाय ते या व्हिडीओमध्ये म्हणाले, “रुपाली ५० वर्षांची आहे आणि मी ६० वर्षांचा नसून ५७ वर्षांचा आहे. पण वय किती आहे याचा काहीही फरक पडत नाही. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की, आता हे सगळं सोडून पुढे जा. प्रत्येकजण त्याचं आयुष्य कशापद्धतीने जगतो याचा आदर करा. नेहमी आनंदी राहा. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम”.

आणखी वाचा – “वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला अन्…” ‘चला हवा येऊ द्या’मधील अभिनेत्याने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाला, “त्यांचा डोळा…”

आशिष आणि त्यांची पहिली पत्नी राजोशी यांना २३ वर्षांचा मुलगा आहे. आशिषची दुसरी पत्नी गुवाहाटी येथील रहिवासी आहे. शिवाय ती एक उत्तम व्यावसायिका आहे. तिचं अपस्केल फॅशन स्टोअर आहे. वयाच्या ५५व्या वर्षीच आशिष यांनी दुसरं लग्न करण्याचं मनाशी ठाम केलं. रुपाली बरुआशी त्यांची मैत्री झाली. या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. म्हणूनच आशिष रुपाली यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ashish vidyarthi share share video after his second marriage talk about age see details kmd