बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे वडील पंडीत पी खुराना यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१९ मे) चंदीगढ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला . गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी १०:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंडीत खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते. ज्योतिषशास्त्राविषयी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांच्या निधनाने खुराना कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आज (१९ मे) सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आयुष्मान खुराना व त्याच्या वडिलांचं अगदी जवळचं नातं होतं. अनेकदा आयुष्मान वडिलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा. वडिलांसाठी लिहिलेल्या खास पोस्टमधून आयुष्मान त्यांच्यप्रती असलेलं प्रेम व्यक्त करायचा.