Bhavin Bhanushali Engagement: बॉलीवूड व टीव्ही अभिनेता, गायक भाविन भानुशाली हा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारदेखील आहे. त्याचे व्हिडीओ आणि व्लॉग खूप चर्चेत राहतात. भाविनने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नुकताच भाविनने साखरपुडा उरकला आहे. त्याने स्वतः साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करून ही गुड न्यूज दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाविन भानुशाली लोकप्रिय अभिनेता आहे. तो अजय देवगणबरोबर ‘दे दे प्यार दे’मध्ये झळकला होता. या चित्रपटात त्याने अजय देवगणच्या मुलाची भूमिका केली होती. २७ वर्षी भाविन लवकरच आपल्या जोडीदाराबरोबर नवीन प्रवास सुरू करतोय. त्याच्या साखरपुड्याच्या फोटो व व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – भयंकर अपघातातून बचावलेल्या कश्मीरा शाहने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, “आता नाकावर…”

तीन दिवसांपूर्वी भाविनचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याचे फोटो त्याने त्याच दिवशी शेअर केले होते. आता त्याने साखरपुड्यातील एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत भाविन व त्याच्या होणाऱ्या पत्नीचे, कुटुंबीय व मित्रांबरोबरचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. ‘Welcome to the Family Miss DB’ असं कॅप्शन भाविनने व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा – प्राजक्ता माळीचा देवावर विश्वास आहे का? चाहत्याच्या प्रश्नाचं एका शब्दात दिलं उत्तर, म्हणाली…

भाविनने चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली असली तरी त्याची होणारी पत्नी कोण आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. भाविनने साखरपुड्या फोटो व व्हिडीओ शेअर केले आहे, मात्र त्यात होणाऱ्या पत्नीला टॅग केलेलं नाही; त्यामुळे ती कोण आहे, काय करते याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा – “ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनचा व्हिडीओ; म्हणाली, “स्वतःला कमी…”

भाविन भानुशालीचे करिअर

भाविन भानुशालीने ‘इश्क पश्मिना’, ‘हू इज यूवर डॅडी’, ‘सोशल करन्सी’, ‘दे दे प्यार दे’, ‘वेल्लापंती’, ‘बब्बर का टब्बर’, ‘रात्री के यात्री’, ‘हमें तुमसे प्यार कितना’, ‘तेनाली राम’, ‘इतना करो ना मुझे प्यार’, ‘कूकी’, ‘मिशन लैला’, ‘तमन्ना’, ‘नन्ही निंद’, ‘मतलब’ या चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor bhavin bhanushali engagement videos and photos viral on social media hrc