बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल सध्या खूप चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली. जगभरात या चित्रपटाने ७०० कोटींचाही टप्पा पार केला आहे. या चित्रपटात बॉबीने नकारात्मक पात्र साकारले होते. चित्रपटातील बॉबी देओलच्या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘अ‍ॅनिमल’मधील अभिनयाव्यतरिक्त बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या गाण्यात बॉबीने केलेली आकर्षक हूक स्टेप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. गाण्यात बॉबीने डोक्यावर ग्लास घेऊन उत्तमरीत्या डान्स केला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याची क्रेझ एवढी वाढली की, अनेकांनी या गाण्यावर हूक स्टेप करीत रीलही बनवल्या होत्या.

हेही वाचा- ‘आदिपुरुष’ आणि त्याच्या निर्मात्यांवर विंदू दारा सिंहची टीका; अभिनेता म्हणाला, “ही एक घोडचूक…”

दरम्यान, बॉबीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच तो त्याच्या इतर चित्रपटांमधील गाण्यावरही थिरकताना दिसत आहे. बॉबीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘अ‍ॅनिमल’नंतर बॉबी देओल लवकरच तमीळ चित्रपटात पदार्पण करणार आहे. बॉबी लवकरच ‘कंगुवा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथचा सुपरस्टार सूर्या प्रमुख भूमिकेत आहे. ‘कंगुवा’मध्ये बॉबीची भूमिका त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. हा चित्रपट तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘३डी’ आणि ‘आयमॅक्स’ या दोन्ही व्हर्जनमध्ये ‘कंगुवा’ प्रदर्शित केला जाणार आहे.