‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातून दमदार पुनरागमन केल्यापासून अभिनेता बॉबी देओल सतत चर्चेत असतो. या चित्रपटातील त्याचा लूक, ‘जमाल कुडू’या गाण्यावरील डान्स याची क्रेझ अजूनही पाहायला मिळत आहे. अलीकडेच बॉबी देओलने अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून बाहेर येताच बॉबीला दोन गरीब मुलं भेटली; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

बॉबी देओलचा हा व्हायरल व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, बॉबी कार्यक्रमातून बाहेर येताच त्याच्या जवळ दोन गरीब मुलगा-मुलगी येतात. तेव्हा अभिनेता खिशातले पैसे काढतो आणि त्यांना ५०० रुपये देतो. एवढंच नाहीतर तो त्या गरीब मुलांबरोबर फोटो काढतो. त्यानंतर मुलगी जाता-जाता बॉबीला म्हणते की, तुम्ही धावत-धावत खूप छान व्हिडीओ करता. हे ऐकून एकच हशा पिकतो आणि अभिनेता देखील हसू लागतो. यावेळी बॉबी त्या गरीब मुलांना म्हणतो, “मेहनत करा.”

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा – ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता लवकरच अडकणार लग्नबंधनात; मराठी कलाकारांनी केलं केळवण

सध्या बॉबीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हा खरा हिरो आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हा खूप छान व्यक्ती आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एकच हृदय किती वेळा जिंकालं.”

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या शूटिंगला कोकणात सुरुवात, कलाकारांचा व्हिडीओ आला समोर

दरम्यान, बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो आता ‘कंगुवा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात बॉबीसह दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या पाहायला मिळणार आहे. अलीकडेच ‘कंगुवा’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला होता.

Story img Loader