अनेक बॉलीवूड कलाकार लग्न, पार्टी, वाढदिवसाचे सेलिब्रेशन अशा इव्हेंट्सना हजेरी लावतात. याबदल्यात त्यांना आयोजक पैसे देतात. काही लोक तर अंत्यसंस्काराला देखील सेलिब्रिटींना बोलावतात. बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेला एकदा असाच अनुभव आला होता. एका कुटुंबाने त्याला अंत्यसंस्काराला येण्यासाठी पैसे दिले होते, असं त्याने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता चंकी पांडेने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये एक किस्सा सांगितला. त्याला कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावलं की तो लगेच जायचा. अशातच एकदा चुकून तो अंत्यसंस्काराला पोहोचला, त्यासाठी त्याला पैसेही देण्यात आले होते. विशेष म्हणजे चंकी रडल्यास जास्त पैसे देऊ, असं त्या कुटुंबाने म्हटलं होतं.

हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

चंकी पांडेने सांगितला मजेशीर किस्सा

चंकी म्हणाला, “जेव्हा मी अभिनेता म्हणून माझ्या करिअरला सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे जास्तीचे पैसे कमवायचा एकच स्रोत होता आणि तो म्हणजे कार्यक्रमांना जाणं. माझ्याकडे एक नेहमी बॅग तयार असायची. मला कोणीही बोलावलं की मी माझी बॅग उचलून तिथे हजर व्हायचो. मग ते लग्न असो, वाढदिवस असो किंवा इतर काही असो. एके दिवशी सकाळी मला एका आयोजकाचा फोन आला. त्याने विचारलं, आज काय करतोयस? मी म्हटलं की मी शूटिंगसाठी निघालोय. त्याने विचारलं की शूट कुठे आहे आणि मी त्याला फिल्मसिटी सांगितलं. मग तो म्हणाला, ‘वाटेत एक छोटासा कार्यक्रम आहे, १० मिनिटांसाठी ये, बरेच पैसे देत आहेत.’ मी होकार दिला. त्याने पांढरे कपडे घालून यायला सांगितलं, तर मी फार विचार न करता पांढरे कपडे कपडे घालून तिथे पोहोचलो.”

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

रडल्यास जास्त मानधन द्यायला होते तयार

पुढे चंकी म्हणाला, “मी पोहोचलो आणि पाहिलं की बाहेर खूप लोक पांढरे कपडे घालून उभे आहेत. मी हळूहळू आत जाऊ लागलो आणि लोक माझ्याकडे बघत होते. ते आपापसात कुजबुजत होते की चंकी पांडे आला आहे. आणि मी विचार करत होतो की नेमकं काय चाललंय. तेवढ्यात मी तिथे एक पार्थिव पाहिले. मग मला समजलं की मी अंत्यसंस्काराला आलोय. मी भोळा होतो, मला वाटले की मी पोहोचलो तोपर्यंत आयोजकाचं निधन झालंय. पण तिथे एका कोपऱ्यात मला आयोजक दिसला. मी त्याला बोलावलं, तो म्हणाला ‘सर, काळजी करू नका, माझ्याकडे तुमचे पाकिट (पैसे) आहेत. पण तुम्ही रडले, तर जास्त पैसे देऊ असं या कुटुंबाने म्हटलं आहे.”

चंकी पांडे म्हणाला की हा प्रसंग खरंच घडला होता. त्याने हा किस्सा सांगितल्यानंतर कपिल शर्मा, गोविंदा, शक्ती कपूर यांच्याबरोबरच प्रेक्षकही पोट धरून हसू लागले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor chunky pandey got money to attend funeral family offered more amount if he cry hrc