अभिनेता इमरान हाश्मी बॉलीवूडमधील टॉपचा अभिनेता मानला जातो. आत्तापर्यंत इमराने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाच्या जोरावर इमरानने प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांव्यतरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही इमरान अनेकदा चर्चेत असतो. दरम्यान आता एका नव्या गोष्टीमुळे इमरान चर्चेत आला आहे.

इमरानने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर इमरानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये इमरान त्याच्या नव्या रोल्स रॉयस (Rolls Royce) कारमधून जाताना दिसत आहे. इमरानच्या या नव्या कारची किंमत १२. २५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. इमरानला गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. आता त्याच्या या कलेक्शनमध्ये आणखी एक आलिशान गाडी दाखल झाली आहे.

हेही वाचा- जया बच्चन पापाराझींवर का भडकतात? अखेर नीतू कपूर यांनी मैत्रिणीबद्दल केला खुलासा; म्हणाल्या, “त्यांचा ओरडा…”

इमरान हाश्मीने त्याच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयसचा समावेश केला आहे. ही भारतातील सर्वात महागडी कार आहे. त्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वास्तविक, इमरान हाश्मीच्या या चमकदार रोल्स रॉयसची किंमत १२.२५ कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये इमरान हाश्मी त्याच्या नवीन कारमध्ये बसलेला दिसत आहे.

इमरानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी इम्रानच्या या पोस्टवर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे. मात्र, काही लोक इम्रानला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरने व्हिडीओवर कमेंट करत इम्रानला, ‘तुझ्या कमाईचा स्रोत काय आहे..’ असा प्रश्न विचारला तर दुसऱ्याने ‘टायगर ३ चे पेमेंट आले आहे असे दिसते..’ अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची इन्स्टाग्रामवर एन्ट्री, कथित गर्लफ्रेंड सुहाना खानने केलं फॉलो, तर गौरी खानने…

इम्राम हाश्मीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘टायगर ३ ‘ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपाटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्याबरोबर सलमान खान व कटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता इम्रान रणवीर सिंहबरोबर ‘डॉन ३’ मध्ये झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader