Actor Himansh Kohli Got Married: ‘यारियां’ फेम प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता व गायिका नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली लग्नबंधनात अडकला. त्याने मंगळवारी (१२ नोव्हेंबरला) नवी दिल्लीतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली. त्याच्या हिमांशने अत्यंत साधेपणाने लग्न केलं. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३५ वर्षांच्या हिमांश कोहलीने अरेंज मॅरेज केलं आहे. हिमांशने नवी दिल्लीत एका खासगी समारंभात विनीशी लग्न केलं. हिमांशच्या लग्नाचा सोहळा खूपच खासगी होता. या लग्नात फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहिले.

हेही वाचा – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

लग्नासाठी हिमांशने गुलाबी रंगाचा कुर्ता व पांढरी धोती नेसली होती. तर त्याच्या पत्नीने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो मूव्हिंग मूमेंट्सने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर “अग्नि की शपथ, फेरे की धारा, और आत्मा की मिलन की आध्यात्मिक यात्रा – एक नई शुरुआत की ओर।” असं कॅप्शन देऊन शेअर केले.

पाहा पोस्ट –

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, हिमांशची पत्नी सिनेसृष्टीतील नाही. हिमांश व विनीचं अरेंज मॅरेज आहे. हिमांश व विनीला नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – Video: प्रसिद्ध दिग्दर्शकाने ४६ व्या वर्षी गुपचूप उरकलं दुसरं लग्न; डॉक्टरशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आला समोर

‘यारियां’ चित्रपटातून हिमांशला खूप लोकप्रियता मिळाली. त्याने ‘स्विटी वेड्स एनआरआय’, ‘हमसे है लाईफ’, ‘रांची डायरीज’, ‘दिल जो ना कह सका’ यामध्ये काम केलं. हिमांशचं फिल्मी करिअर फारसं यशस्वी राहिलं नाही. ‘बुंदी रायता’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात रवी किशन, राजेश शर्मा, सोनाली सहगल आणि शिल्पा शिंदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor himansh kohli got married to vini in temple wedding photos viral hrc