सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई बघायला मिळत आहे. कतरिना-विकी, अलिया-रणबीर यांच्यापाठोपाठ कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबंधनात अडकले. या सगळ्या स्टर्सच्या लग्नाची जबरदस्त चर्चा झाली. आता यांच्यानंतर हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसत आहे. हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता हृतिक आणि सबा आपल्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार करत आहेत.

हेही वाचा- “माझ्या कुटुंबावर टीका करून काय मिळतं?” ट्रोलर्सच्या आक्षेपार्ह कमेंट्स पाहिल्यावर करण जोहर भडकला, म्हणाला…

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

हृतिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काहीच दिवसांत हृतिकच्या नव्या अफेअरची चर्चा सुरू झाली. हृतिक आणि सबाला बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं. बऱ्याच पार्टीजमध्येसुद्धा या दोघांचे एकत्र फोटो व्हायरल होते. सोशल मीडियावर यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाल्यावर आता त्यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. आता मीडिया रीपोर्टनुसार हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. हृतिकनेही सबाबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हे दोघे कधी आणि कुठे लग्न करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अर्थात याबद्दल हृतिक किंवा सबा या दोघांकडून पुष्टी झालेली नाही. सध्या या दोघांचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. २०१४ मध्ये हृतिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्या अफेअरबद्दल लोकांना माहिती झाली. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी ते दोघे एकत्र मीडियासमोर आले आणि त्यांचं अफेअर असल्याचं स्पष्ट झालं. हृतिक सध्या त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Story img Loader