बॉलीवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिक रोशनची सध्या अमेरिकेत खूप चर्चा आहे. अमेरिकेच्या सोशल मीडियावर हृतिकची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामुळे अमेरिकेचे नागरिक गुगलवर ५० वर्षीय हृतिक रोशनला जाणून घेण्यासाठी ‘हा कोण आहे?’ असं सर्च करत आहेत. हृतिक रोशनच्या संबंधित व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय आहे? जाणून घ्या…
व्हायरल पोस्टमध्ये हृतिक रोशन आणि अमेरिकन वृद्ध व्यक्तीचा फोटो आहे. या दोघांची तुलना केली जात आहे. जुन्या काळातील ५० वर्षीय व्यक्ती कशी दिसायची आणि आताच्या काळातील ५० वर्षीय व्यक्ती कशी दिसते. हृतिक आणि अमेरिकन वृद्ध व्यक्तीचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “१९८५ मधील ५० वर्षीय लोक आणि २०२५ मधील ५० वर्षीय लोक.” हीच पोस्ट सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ७० हजारांहून अधिक जणांनी लाइक केली असून जवळपास १० मिलियहून अधिक जणांनी पोस्ट पाहिली आहे.
या व्हायरल पोस्टमुळे अमेरिकेत हृतिक रोशनचा धुमाकूळ सुरू आहे. ज्यांना हृतिक माहीत नाही ते गुगलवर सर्च करत आहेत, ‘हा कोण आहे?’ हृतिकच्या चाहत्यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळख करून दिली आहे. तो भारतातील सर्वात हँडसम आणि यशस्वी अभिनेता असल्याचंही सांगितलं आहे. त्याशिवाय काही चाहत्यांना हृतिक आणि वृद्ध व्यक्तीमधील तुलना पटलेली नाही. एक चाहता म्हणाला, “बहुतेक लोकांना माहीत नाही की उजवीकडची व्यक्ती कोण आहे? हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील एक मेगा सुपरस्टार आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं की, तुम्ही एका अभिनेत्याची तुलना एका सामान्य माणसाशी करत आहात. तसंच तिसऱ्या चाहत्याने लिहिलं, “हृतिक रोशन जगभरात लोकप्रिय आहे.”
It’s funny cause it’s true. ??? Why do you think that is though? pic.twitter.com/4yzLJTCEVX
— TheLizVariant (@TheLizVariant) April 5, 2025
It’s funny cause it’s true. ??? Why do you think that is though? pic.twitter.com/4yzLJTCEVX
— TheLizVariant (@TheLizVariant) April 5, 2025
Yeah, but who is that guy on the right?
— Zack (@Legiticus) April 5, 2025
दरम्यान, अलीकडेच राकेश रोशन यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती. ‘क्रिश ४’ चित्रपटाचं दिग्दर्शन हृतिक करणार असं राकेश रोशन यांनी जाहीर केलं होतं. हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ‘वॉर २’ चित्रपटात तो पाहायला मिळणार आहे. यामध्ये कबीर धालीवालच्या भूमिकेतच हृतिक झळकणार आहे. ‘वॉर २’ चित्रपटात हृतिकसह दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर दिसणार आहे. हृतिकला शेवटचं ‘फायटर’ चित्रपटात बघितलं होतं. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणसह झळकला होता.