बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने आतापर्यंत क्रिश, वॉर यांसारख्या अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांचे मन जिंकले आहे. सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘फायटर’चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘फायटर’चित्रपट सुद्धा अ‍ॅक्शनवर आधारित असणार आहे. हृतिकचे चाहते गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटात हृतिक जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

हेही वाचा : “माय हँडसम…”, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त मलायका अरोराने शेअर केलेली रोमॅंटिक पोस्ट चर्चेत

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर

प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली असून हृतिकने ‘फायटर’ चित्रपटाची पहिली झलक आणि रिलीज डेट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोमध्ये हृतिकने एअरफोर्स फायटरचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये हृतिक फायटर प्लेनला हात लावून उभे राहिल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कोकणात जाऊन घडवतेय मडकी, ‘तो’ फोटो शेअर करीत म्हणाली “कळलंय आयुष्य मला…”

हृतिक रोशनचा बहुचर्चित फायटर चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हृतिकच्या चाहत्यांना चित्रपटाची ७ महिने वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा ‘फायटर’ देशभक्तीपर चित्रपट असणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून यापूर्वी त्यांनी हृतिकच्या ‘वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

हेही वाचा : अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायकाच्या डान्सची चर्चा; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले “तुझा मुलगा…”

मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार ‘फायटर’ चित्रपटाचे बजेट जवळपास २५० कोटी आहे. यामध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader