बॉलीवूडच्या लोकप्रिय रोशन कुटुंबावर आधारित असलेल्या ‘द रोशन्स’ ( The Roshans ) डॉक्युमेंट्रीची नुकतीच सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत रोशन कुटुंबासह बॉलीवूडचे काही कलाकार पाहायला मिळाले. तसंच यावेळी ‘कोई मिल गया’ चित्रपटाची टीम एकत्र दिसली. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक दिग्गजांनी ‘द रोशन्स’ डॉक्युमेंट्रीच्या सक्सेस पार्टीला खास हजेरी लावली होती. या सक्सेस पार्टीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते फक्त एकाच व्यक्तीने. ही व्यक्ती म्हणजे हृतिक रोशनचा मुलगा रिदान.
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानला दोन मुलं आहेत. एका मुलाचं नाव रेहान आणि दुसऱ्या मुलाचं नाव रिदान आहे. ‘द रोशन्स’ डॉक्युमेंट्रीच्या सक्सेस पार्टीमध्ये हृतिकचा छोटा मुलगा आजोबा राकेश रोशन यांच्याबरोबर पाहायला मिळाला. यावेळी रिदान कार्गो पॅन्ट, चेक शर्ट आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसला. रिदान खूपच स्टाइलिशन आणि हँडसम दिसत होता. हृतिकच्या १७ वर्षांच्या मुलाच्या या हँडसम लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे रिदानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
हृतिक रोशनच्या धाकट्या मुलाला पहिल्यांदा पहिल्यामुळे नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “गोड मुलगा आणि भविष्यातला नॅशनल क्रश भेटला.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आर्यन आणि इब्राहिमला तगडा प्रतिस्पर्धक भेटला. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हा मोठा झाल्यानंतर हृतिकपेक्षा जास्त हँडसम दिसेल.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मोठा झाल्यानंतर वडिलांसारखा स्मार्ट असेल.”

दरम्यान, हृतिक रोशन आणि सुझान खानने २०००मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर दोन मुलांचे आई-वडील झाले. २००६मध्ये रेहानचा जन्म झाला. तर २००८मध्ये रिदानचा जन्म झाला. परंतु २०१४मध्ये हृतिक आणि सुझानने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सध्या हृतिक सबा आजादला डेट करताना दिसत आहे. तर सुझान अर्सलान गोनीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. पण, हृतिक आणि सुझानने अजूनपर्यंत दुसरं लग्न करण्याचा कोणताही विचार केलेला नाही.