बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या ‘फायटर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकलेली हृतिक व दीपिका पदुकोणची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अशातच हृतिकचा एक असा फोटो समोर आला आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अभिनेता हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहित हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुबड्यांच्या आधारावर उभा असलेला हृतिक दिसत आहे. तसेच त्याने कमरेला पट्टा लावला आहे. हा फोटो पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण हृतिकने त्याच्या पोस्टमुळे हा फोटोमागची गोष्ट सांगितली आहे.
हृतिकने लिहिलं आहे, “तुमच्यापैकी किती जणांना कुबड्यांचा किंवा व्हीलचेअरची आधार घेण्याची गरज भासली? आणि यामुळे तुम्हाला कसं वाटलं? मला आठवतंय की, माझ्या आजोबांनी विमानतळावर व्हीलचेअरवर बसण्यासाठी नकार दिला होता. कारण ती गोष्ट त्यांच्या मजबूत मानसिक प्रतिमेश जुळत नव्हती. त्यावेळेस मी म्हणालो होतो, ही तर फक्त एक जखम आहे. याचा वयाशी काहीही संबंध नाही. ही व्हीलचेअर तुम्हाला झालेली दुखापत बरी होण्यास मदत करेल आणि यामुळे आणखी नुकसान होण्यापासून बचाव होईल. त्यावेळेस भीती आणि लाज लपवण्यासाठी त्यांना किती खंबीर असण्याची गरज आहे हे पाहून मला वाईट वाटलं. मला त्याचा अर्थ कळला नाही. मला असहाय्य वाटलं. मी माझा तर्क लावला की, वय याला कारण नाहीये. त्यांना दुखापतीमुळे व्हीलचेअर गरजेची होती. त्यांनी स्वतःची प्रतिमा मजबूत दाखवण्यासाठी व्हीलचेअरला नकार दिला. यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि उपचाराला उशीर झाला.”
पुढे हृतिकने लिहिलं, “त्या परिस्थितीमध्ये ते निश्चित योग्य होते, हा एक गुण आहे. ही एका सैनिकाची मानसिकता असते. माझे वडील देखील या परिस्थितीतून गेले आहेत. पुरुष शक्तीशाली असतात. पण जर तुम्ही कधी म्हणालं की, सैनिकांना कुबाड्यांची कधी गरज भासत नाही आणि वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असेल तेव्हा त्यांनी नकार द्यावा. कारण मजूबत असल्याचा भ्रम दाखवण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं, आदर ही गोष्ट इतकी महत्त्वाची झाली आहे की, थेट मूर्खपणाच्या सीमेपर्यंत पोहोचली आहे. माझं म्हणणं आहे, खरे सामर्थ्य म्हणजे आराम, संयम आणि पूर्णपणे जाणीव असणे की काहीही नाही, कुबाड्या नाही, व्हीलचेअर नाही, कोणतेही अपंगत्व किंवा असुरक्षितता नाही. आणि निश्चितपणे कोणतीही बसण्याची स्थिती ही मोठी प्रतिमा कमी किंवा बदलू शकत नाही.”
“सर्व नीट असूनही नेहमी मशीनगसह “फ…” म्हणणारा रॅम्बो होणं म्हणजे ताकद नाही. काहीवेळा हे निश्चितपणे लागू होते आणि हाच प्रकार आहे ज्याची आपण सर्वजण आकांक्षा बाळगतो. असो, काल माझा एक स्नायू ताणला. ही एक मोठी गोष्ट आहे, कुबड्या हे फक्त एक रूपक आहे. जर तुम्हाला ते समजले असेल तर तुम्हाला हे समजेल.”, असं हृतिक म्हणाला. माहितीनुसार, हृतिकच्या कमरेपासून खालच्या शरीरातील नसा पूर्णपणे खेचल्या गेल्या. त्यामुळे अभिनेत्याला कंबर आणि पाय हलवता येत नव्हतं. त्याची दुखापत इतकी वाढली की त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.
हेही वाचा – Video: गायिका आर्या आंबेकरच्या आवाजात ‘दबक्या पावलांनी आली’ गाणं भेटीला, पाहा व्हिडीओ
दरम्यान हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘फायटर’नंतर लवकरच त्याचा ‘वॉर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची अद्याप अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. याशिवाय हृतिक ‘क्रिश ४’ चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे.