बॉलिवूडचा ग्रीक गॉड अर्थात हृतिक रोशन, चित्रपटामुळे व खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटात तो झळकला होता. हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. हृतिक पहिल्यांदाच या चित्रपटात एक वेगळ्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या लूकचीदेखील चर्चा झाली होती. आता त्याच चित्रपटातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर आज बॉलिवूडचे कलाकार कायमच सक्रीय असतात. एका पापाराझीने या चित्रपटाच्या सेटवरचा हृतिक रोशन व त्याचा स्टंट मॅनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मन्सूर अली खान असे या स्टंट मॅनचे नाव आहे. अवघ्या काही तासात तो प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र हा फोटो बघून नेटकऱ्यांना सुशांत सिंहची आठवण झाली आहे. नेटकऱ्यांनी तशा कमेंट्स केल्या आहेत.
बॉलिवूडच्या वाईट काळावर रणबीर कपूरने केलं भाष्य; म्हणाला “पठाणचे…”
हृतिकच्या या फोटोवर एकाने लिहले आहे, “मला एका मिनिटासाठी वाटले हा तर सुशांत आहे”, तर दुसऱ्याने लिहले आहे, “हा सुशांतसारखा दिसत आहे.” तिसऱ्याने लिहले आहे, “दोघांमधला हृतिक कोण आहे कळत नाही.” आणखीन एकाने लिहले आहे “डिट्टो सुशांत सिंह.” सुशांत सिंहवरून त्याचे चाहते भावुक होताना दिसून आले
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता २ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे मात्र त्याचे चाहते त्याला विसरलेले नाहीत. त्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीतील वातावरण ढवळून निघालं होतं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत मानवची भूमिका साकारून सुशांत सिंह राजपूतने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने चित्रपट निर्मात्यांचं लक्ष वेधलं आणि त्याला चित्रपट मिळाले. काय पो चे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘पीके’ एम. एस. धोनी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे.