‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सतत कानावर पडत आहे. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. या गाण्यावरील अनेक रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्तालाही या गाण्याची भुरळ पडली आहे.
‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ता सध्या गरोदर आहे. नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. इशिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती गरोदरपणातील काळ एन्जॉय करताना दिसत आहे. इशिताला ‘बहरला हा मधुमास’ गाण्याने भुरळ घातली आहे. त्यामुळे गरोदरपणातही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह तिला आवरता आलेला नाही.
इशिताने टीव्ही अभिनेत्री तन्वी थप्परसह बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तन्वीही गरोदर आहे. इशिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दोघी ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
हेही वाचा>> UK मधील रेडिओलाही पडली ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, अंकुश चौधरी पोस्ट शेअर करत म्हणाला…
रीलवर ट्रेंडिग असलेलं ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ३० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी व सना शिंदे मुख्य भूमिकेत आहेत.