बॉलिवूडचा जग्गू दादा अशी ओळख असलेला अभिनेता जॅकी श्रॉफ, ८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण केलं आहे. हिंदी, मराठी, गुजराती या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आपल्या अभिनयपेक्षा स्टाईल, बोलण्याचा अनोखा अंदाज यामुळे जॅकी चर्चेत येत असतात. जॅकी श्रॉफ लवकरच कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘फोन भूत’ चित्रपटात दिसणार आहे. या निमित्ताने त्यांनी नवभारत टाईम्सला मुलखत दिली आहे. ज्यात ते अनेक विषयांवर मनमोकळेपणाने बोलले.

मुलाखतीत ते असं म्हणाले की “मी याआधी ‘भूत अंकल’, ‘भूत’ असे चित्रपट केले आहेत. फोन भूत उत्तम विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात मी भुताची व्यक्तिरेखा साकारली आहे जी प्रेमाच्या शोधात आहे. प्रेमाची किंमत प्रत्येकाने केली पाहिजे. समजून घेणे प्रेम ही खूप शुद्ध भावना आहे. अशा प्रकराची भूमिका मी बऱ्याच दिवसांनी करत आहे. चित्रपटातील भूमिकेविषयी ते पुढे म्हणाले “बटाटा असतो ना आपला तो मी आहे ज्याप्रमाणे बटाट्याला वांग्यात घाला, बिर्याणीत घाला, मटणात घाला त्याचप्रमाणे मला कुठलीही भूमिका द्या मी फिट होऊन जातो. आणि लोकांना त्याचा आनंद मिळतो. मी जास्त विचार करत नाही”.

मोरबी दुर्घटनेनंतर इरफानच्या ‘मदारी’ चित्रपटातील ‘तो’ सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल

१९८२ मध्ये आलेल्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून श्रॉफ यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्याआधी ते मॉडेलिंग करत होते. पुढच्या वर्षी, सुभाष घईने तिला त्यांच्या ‘हीरो’ चित्रपटात मुख्य भूमिकेत कास्ट केले ज्यात जॅकीची नायिका मीनाक्षी शेषाद्री होती. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर जॅकीने अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘फोन भूत’ हा हॉरर चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे करण्यात आली आहे. ‘कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या बरोबरीने शीबा चढ्ढा, निधी बिश्त, मनु ऋषी चढ्ढा गुरमीत सिंग असे गुणी कलाकार या चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत.