‘द गाझी अटॅक’, ‘व्होडका डायरीज’, तर ‘गुलाल’,‘ लाइफ इन मेट्रो’, ‘हैदर’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स’ अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा के. के. मेनन सारखा चोखंदळ अभिनेता बॉलीवूडमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्रतिभावंत कलाकारांपैकी एक आहे. कारकीर्दीतील कालावधीपेक्षा पडद्यावर कमी वेळा दिसलेला तरीही चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षक व समीक्षक यांच्या कौतुकास पात्र ठरलेला हा अभिनेता लोकांच्या मनात आजही घर करून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच के के यांनी ‘द लल्लनटॉप’च्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल आणि त्यांच्या आजवर प्रदर्शित होऊ न शकलेल्या ‘पांच’ या चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे. पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘पांच’ हा २००३ चा चित्रपट जो आजवर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटात अंमली पदार्थांचे सेवन, हिंसा आणि शिवीगाळ यामुळे या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी आणली होती. या चित्रपटादरम्यानचा अनुभव के के ने शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘कांदे पोहे’ फेम भाग्यश्री लिमयेच्या कॅज्यूअल लूकची चर्चा; अभिनेत्रीचे पांढऱ्या टॉपमधील फोटो व्हायरल

के के म्हणाले, “या चित्रपटाने मला मोठा धडा शिकवला. आमचे निर्माते दर आठवड्याला चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख सांगायचे, पण आम्हाला माहिती होतं की हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मी या चित्रपटाला प्रदर्शित न होताही सर्वात जात पाहिला गेलेला चित्रपट मानतो. कारण ऑनलाइन हा चित्रपट खूप लोकांनी अनेकदा पाहिला.”

या चित्रपटाचं कौतुक खुद्द निर्माते दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनीदेखील केलं होतं. याबद्दल के के म्हणाले, “पांचच्या एका स्क्रीनिंगदरम्यान विधु विनोद चोप्रा म्हणाले, की के के तू टॅक्सी ड्रायव्हरच्या रॉबर्ट डी नेरोच्या तोडीचं काम केलं आहेस. हे ऐकून मला फार आनंद झाला, वाटलं की आता आपली इंडस्ट्रीत दखल घेतली जाईल, पण यापैकी काहीच झालं नाही. त्या चित्रपटामुळे कायम निराशाच आमच्या पदरी पडली.” अनुराग कश्यपच्या ‘पांच’मध्ये के के यांच्यासह विजय मौर्य, आदित्य श्रीवास्तव, जॉय फर्नांडिज, तेजस्विनी कोल्हापुरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor k k menon speaks about his film paanch not getting released avn
Show comments