अभिनेता इमरान हाश्मीनं आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी इमरान एक आहे. अनेक मोठे चित्रपट त्यानं केले आहेत. अलीकडेच तो ‘सेल्फी’ चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला पावसाळ्यात खायला आवडतो कर्जतचा ‘हा’ पदार्थ; म्हणाली, “मी आणि माझी मैत्रीण…”
सध्या इमरान हाश्मी आगामी चित्रपट ‘टायगर ३’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकारली आहे. यावरून बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान म्हणजेच केआरके यानं ट्वीट करून इमरान हाश्मीची खिल्ली उडवली आहे. “या जन्मात इमरानचं स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही,” असं केआरके म्हणाला आहे.
केआरकेनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “इमरान हाश्मी बॉलीवूडमधला असा एकमेव अभिनेता आहे, जो नेहमी आपलं करिअर बनवण्यासाठी दुसऱ्या स्टार्सवर अवलंबून असतो. बिचाऱ्यानं अजय देवगण आपल्याला स्टार बनवेल या अपेक्षेनं अजयबरोबर चित्रपट केला. त्यानंतर याचं अपेक्षेनं इमराननं अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’मध्ये काम केलं. आता तो ‘टायगर ३’च्या प्रतिक्षेत आहे. हा चित्रपट त्याला स्टार बनवेल अशी त्याची अपेक्षा आहे. पण इमरान भाई या जन्मात तर असं होणार नाही. पुढच्या जन्मात काय होईल याबाबत मी काही सांगू शकत नाही.”
हेही वाचा – समीर वानखेडे यांना क्रांती रेडकर नाही तर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आवडते
केआरकेच्या या ट्वीटवर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “तुम्हीच एक चित्रपट करून इमरान हाश्मीला स्टार का नाही बनवतं?” तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “इमरान हाश्मीला काही बोलू नका. तो बॉलीवूडचा रोमियो आहे.”
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतून आणखी एक एक्झिट; ‘या’ ज्येष्ठ कलाकाराच्या जागी दिसणार ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता
दरम्यान इमरानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो शांतनू बागची यांच्या ‘फादर्स डे’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत ‘टायगर ३’ चित्रपटातही इमरान दिसणार आहे.