काही दिवसांपूर्वी बहुचर्चित ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळा पार पडला. यंदाचा ‘आयफा पुरस्कार’ जयपूर येथे आयोजित करण्यात आला होता. ८ मार्चला ‘आयफा डिजिटल पुरस्कार’ पार पडल्यानंतर ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळा ९ मार्चला मोठ्या दिमाखात झाला. या सोहळ्यात शाहरुख खान, माधुरी दीक्षित, क्रिती सेनॉन, शाहिद कपूर, करीना कपूर अशा बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. ‘आयफा पुरस्कार २०२५’मधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील कार्तिक आर्यनच्या आईच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळ्यात कार्तिक आर्यनने करण जोहरबरोबर सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी कार्तिकला ‘भूल भुलैया ३’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात कार्तिकच्या आईने भावी सूनेविषयी भाष्य केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये करण जोहर कार्तिक आर्यनच्या आईला भावी सूनेबद्दल विचारते. तेव्हा कार्तिकची आई म्हणते, “कुटुंबियांच्या मते एक चांगली डॉक्टर मुलगी हवी आहे.” याआधीही कपिल शर्माच्या शोमध्ये कार्तिकच्या आईने ही इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, “माझी सून डॉक्टर असावी.” कार्तिकच्या कुटुंबात सर्वजण डॉक्टर आहेत. आई, वडील आणि बहीण तिघंजण डॉक्टर आहेत.

कार्तिकच्या आईचा ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यातील व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. कार्तिक ११ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत असल्याची हिंट त्याच्या आईने दिल्याचं म्हटलं जात आहे. कार्तिक डेट करत असलेली ही अभिनेत्री म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय श्रीलीला.

कार्तिक आर्यन आणि श्रीलीलाच्या अफेअरची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांआधी अभिनेत्याच्या घरातील एका कार्यक्रमातील श्रीलीलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. आता कार्तिकच्या आईने सून डॉक्टर पाहिजे असल्याचं सांगितल्यामुळे कार्तिक श्रीलीलाच डेट करत म्हटलं जात आहे. कारण श्रीलीलाने एमबीबीएस शिक्षण घेतलं आहे.

दरम्यान, ‘आशिकी-३’ चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर श्रीलीला झळकणार आहे. यामधील तृप्ती डिमरी कार्तिकबरोबर स्क्रीन शेअर करणार होती. पण, तृप्ती डिमरीचा पत्ता कट करून श्रीलीला घेतलं आहे. ‘आशिकी-३’ चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासु करत आहे.

Story img Loader