बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम विविध कारणांमुळे चर्चेत येत असतो. सोमवारी चेंबूर येथे झालेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेत सोनू निगमला किरकोळ दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच घटनेवर आता प्रसिद्ध अभिनेत्याने भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता व समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं तो समीक्षण करत असतो. त्याने आता सोनू निगमवर ट्वीट केले आहे. तो असं म्हणाला “सोनू निगमला भारतातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती आहे. त्यामुळे त्याचे कुटुंब गेल्या ५ वर्षांपासून दुबईत आहे. पण मी त्याला सांगितले आहे जेव्हा कधी ते भारतात येतील तेव्हा काळजी घ्यायला सांग. मला आशा आहे की तो व्यवस्थित व ठीक आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

Video : धक्काबुक्कीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला सोनू निगम, तब्येतीबाबत माहिती देत म्हणाला…

दरम्यान, या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीचं नाव स्वप्नील फेटरपेकर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली.

चेंबुरचे आमदार प्रकाश फातर्पेकरांनी ‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधताना म्हणाले, “माझ्या मुलाने सोनूवर हल्ला केलेला नाही. तुम्ही जर तो व्हिडीओ नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की हे चुकून घडलं आहे, त्याने मुद्दाम हे केलेलं नाही. सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना माझा मुलगा तेव्हा फक्त एक सेल्फी घ्यायचा प्रयत्न करत होता.”