अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘दृश्यम २ ‘च्या यशानंतर पुन्हा एकदा अजयच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. ‘भोला’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन ५ दिवस उलटले असून चित्रपटाने नुकताच ५० कोटींचा आकडा पार केला आहे. दरम्यान, भोलाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनची खिल्ली उडवताना केआरकेने अजय देवगणची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा- “भारतात राहणे म्हणजे..” स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटवर नेटकरी भडकले; म्हणाले, “पाकिस्तानात…”

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

कमाल रशीद खान यांनी ट्विट करून लिहिले की, ‘माझ्या सूत्रांनुसार, भोलाच्या अपयशानंतर अजय देवगण डिप्रेशनमध्ये गेला आहे आणि त्याने त्याचा फोन बंद ठेवला आहे. अजयला एका आठवड्यात १०० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा होती, ती झाली नाही. इतर प्रत्येक अभिनेत्याच्या यशावर अजय जळतो आणि हे बॉलीवूडच्या लोकांना चांगलेच ठाऊक आहे.

हेही वाचा- “मी फक्त…”; बॉलिवूडमधील राजकारणाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबाबत प्रियांका चोप्राने दिलं स्पष्टीकरण

युजर्सची प्रतिक्रिया

केआरकेच्या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अमित नावाच्या युजरने लिहिले की, ‘आता काय करायचे साहेब, अच्छे दिन आलेच नाहीत, तर ट्रकवाले काय करणार? अजयला तुमच्यासारखा कोणावरही जळत नाही. तूच अजय देवगणवर जळतो. १०१ टक्के खात्री आहे की भोला १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल आणि सुपरहिट होईल. रौनक नावाच्या युजरने लिहिले की, ‘हा कपिलच्या शो मधील प्रमोशनचा परिणाम आहे’.

हेही वाचा- “यार गौरी तू…”; पत्नीने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर शाहरुख खानची मजेशीर कमेंट

चित्रपटाची कमाई

अजयच्या भोला चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ११.२० कोटींची कमाई केली. तर शुक्रवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी ७.४० कोटींची कमाई केली होती. शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसात मात्र चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ दिसून आली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी तर चौथ्या दिवशी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Story img Loader