‘पठाण’च्या यशानंतर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. किंग खानचा ‘पठाण’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. शाहरुख त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खानने ‘जवान’ चित्रपटाची घोषणा केल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्याचा हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित करणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

या चित्रपटाची रिलीज डेट समोर आल्यानंतर बॉलीवूड अभिनेता कमाल राशिद खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. केआरके यांनी याबाबत ट्वीट केले आहे. ‘पठाण’प्रमाणे शाहरुख ‘जवान’लाही प्रमोट करणार नाही, असे केआरकेचे म्हणणे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो हा चित्रपट हिट करणार असल्याचे केआरके यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Chhaava
‘छावा’ चित्रपटातील मराठी अभिनेत्याचे ‘त्या’ हटवलेल्या सीनबद्दल वक्तव्य; म्हणाला, “मला खात्री…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Chhava Movie
‘छावा’मध्ये ‘ती’ वादग्रस्त दृष्ये का घेतली? दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी संगितलं नेमकं कारण
Chhaava Movie Controversy Political Reactions Udayanraje Bhosale sambhajiraje Chhatrapati
ऐतिहासिक चित्रपट, वादग्रस्त दृष्य व राजकीय वाद,’छावा’च्या बाबतीत नेमकं काय घडतंय?
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

हेही वाचा- Video : ‘मेट गाला’मध्ये आलियाला ऐश्वर्या म्हणत फोटोग्राफर्सनी मारली हाक; अभिनेत्रीने बघितले अन्..

कमाल रशीद खानने ट्विट करून शाहरुख खानचे कौतुक केले आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘शाहरुखने सर्व पर्यायांवर चर्चा करण्यासाठी त्याच्या टीम आणि वितरकांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि अखेर २ जून २०२३ रोजी जवान प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट हिट होण्यासाठी २० दिवसांचे प्रमोशन पुरेसे आहे आणि शाहरुख खान परिपूर्ण आहे, असे त्याचे मत आहे. कारण पठाणप्रमाणेच तो या चित्रपटाचेही केवळ ट्विटरवर प्रमोशन करणार आहे.

केआरकेने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘शाहरुख पठाणच्या प्रमोशनसाठी कोणत्याही न्यूज चॅनल, कोणत्याही शो किंवा कोणत्याही कार्यक्रमात गेला नाही तो ‘जवान’ठीही तेच करतोय! तो फक्त सोशल मीडियावर जवानाचे प्रमोशन करणार आहे आणि तो नक्कीच हिट होणार आहे. भीक मागण्याने चित्रपट हिट होत नाही हे शाहरुख खानने सिद्ध केले आहे.

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट २ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानची दुहेरी भूमिका आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर विजय सेतूपतीचीही मुख्य भूमिका आहे. याव्यतिरिक्त दीपिका पदुकोण, विजय, साउथची अभिनेत्री नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि प्रियामणी या चित्रपटात दिसणार आहेत.

Story img Loader