नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘जोगिरा सारा रा रा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट म्हणावी तशी कमाई करु शकलेला नाही. नुकतचं नवाजने बिग बजेट चित्रपटांबाबत वक्तव्य केल होतं. माझ्यासारख्या कलाकाराला घेऊन कोणीही अद्याप बिग बजेट चित्रपट केला नसल्याची खंत नवाजुद्दीने व्यक्त केली होती. नवाजुद्दीनच्या या वक्तव्यावर आता प्रसिद्ध अभिनेता कमाल रशिद खान याने टीका केली आहे. केआरकेने ट्वीट करत नवाजुद्दीनला सल्ला दिला आहे.

हेही वाचा- “माझी बायको नेहमीच…”; लग्नाच्या ८ वर्षानंतर शाहिद कपूरचे मीरा राजपूतबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”

कमाल रशीद खानने ट्वीट केले की, ‘नवाजुद्दीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याला सोलो हिरो म्हणून कोणीही बिग बजेट चित्रपट ऑफर केलेला नाही. प्रिय नवाजुद्दीन, आरशात तुमचा चेहरा बघा आणि तुम्हाला समजेल की कोणी तुम्हाला छोटी भूमिका ऑफर करत असली तरी ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण तू विचित्र दिसतोस.” केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ने नवाजुद्दीन सिद्दीकीचे नशीब पालटले. त्यानंतर नवाजने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. यावर्षी नवाजुद्दीनच्या हातात जवळपास ८ चित्रपट आहेत, ज्यात ‘हुड्डी’, ‘संधव’, ‘अदभूत’, ‘टिकू वेड्स शेरू’, ‘नूरानी चेहरा’, ‘बोले चुडिया’ आणि ‘संगीन’ यांचा समावेश आहे. त्याचा ‘जोगिरा सारा रा रा’ नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader