अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट ‘भोला’ अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाने ६ दिवसांत ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. भोला चित्रपटाच्या या अपयशावरुन अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान यांनी अजय देवगणची खिल्ली उडवली आहे. केआरकेने अजय देवगणला एक सल्ला दिला आहे.

हेही वाचा- ‘या’ अभिनेत्रीच्या संशयास्पद मृत्यूनंतर रवीना टंडनला मिळालं ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो

केआरकेने ट्वीट करत अजयवर निशाणा साधला आहे. “भोलाच्या (Bholaa) अपयशानंतर अजय देवगणने त्याचे नाव बदलून अजय देवगॉन ( Ajay Devgone) ठेवावे.” असं म्हणत केआरकेने अजयची खिल्ली उडवली आहे.

यापूर्वीही केआरकेने भोला चित्रपटाच्या अपयशावरुन अजय देवगणची खिल्ली उडवली आहे. ‘माझ्या सूत्रांनुसार, भोलाच्या अपयशानंतर अजय देवगण डिप्रेशनमध्ये गेला आहे आणि त्याने त्याचा फोन बंद ठेवला आहे. अजयला एका आठवड्यात १०० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा होती, ती झाली नाही. इतर प्रत्येक अभिनेत्याच्या यशावर अजय जळतो आणि हे बॉलीवूडच्या लोकांना चांगलेच ठाऊक आहे. अस म्हणत त्यांनी अजयला डिवचलं होतं.

हेही वाचा- Bholaa Box Office Collection: ‘भोला’ने पार केला ५० कोटींचा आकडा; जाणून घ्या सहाव्या दिवसाची कमाई

चित्रपटाची कमाई

अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट नोंदवण्यात आली होती. शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसात मात्र चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ दिसून आली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी तर चौथ्या दिवशी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई केली. पण आता चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. आता सहाव्या दिवशी चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण ५३.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Story img Loader