Govinda Health Update: अभिनेता गोविंदाला मंगळवारी ( १ ऑक्टोबर ) त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे सध्या गोविंदाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबातील मंडळींसह अनेक कलाकार मंडळी रुग्णालयात सातत्याने जाताना दिसत आहेत.
गोविंदाला गोळी लागल्याचं कळताच भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह रुग्णालयात पोहोचली होती. यावेळी ती एकटीचं होती. तिच्याबरोबर कृष्णा नव्हता. कामानिमित्ताने कृष्णा परदेशात असल्याची माहिती कश्मीराने दिली. त्यानंतर आता कृष्णाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मामा गोविंदाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा – ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, पाच दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
बऱ्याच काळापासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये कौटुंबिक वाद होते. यामुळे मामा-भाच्याची जोडी कधीच कुठल्याही चित्रपट किंवा कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाली नाही. जर कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली तर त्या दिवशी कृष्णा शूटिंगला येत नव्हता. पण हे वाद बाजूला ठेऊन गोविंदाने भाची आणि कृष्णाची सख्खी बहीण आरती सिंहच्या लग्नात खास उपस्थिती लावली. त्यानंतर कृष्णा आणि गोविंदामधील नातं सुधारलं आहे. त्यामुळे कृष्णाने गोविंदाच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
कृष्णाने इन्स्टाग्रामवर गोविंदाच्या प्रकृतीसंदर्भात पोस्ट केली आहे. त्याने लिहिलं आहे, “मामाच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाबद्दल खूप खूप आभारी आहे. लवकरच ते बरे होती, अशी प्रार्थना करू.” दरम्यान, कृष्णाने ‘हिंदुस्थान टाइम्स’शी संवाद साधताना सांगितलं की, तो ऑस्ट्रेलियाला आहे. त्यामुळे मी मामा भेटू शकत नाही.
गोविंदाने मॅनेजर शशी सिन्हाने दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपली परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो सध्या रुग्णालयात आहे.