हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतो. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

हेही वाचा- “आमची बदनामी…”, मनोज वाजपेयीच्या चित्रपटाला आसाराम बापू ट्रस्टनं पाठवली नोटीस

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
woman was cheated, lure of government job,
पुणे : शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २० लाखांची फसवणूक
kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”

अलीकडेच त्यांनी बॉलीवूड हंगामाला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्याला अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर नेमकं कस वाटलं होतं, याबाबत खुलासा केला आहे. बाजपेयी म्हणाले, “जेव्हा मला ओळख मिळू लागली, तेव्हा माझ्याकडे पर्याय होते. मी प्रसिद्धी आणि ओळख मिळाल्यानंतर काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. कारण लोक माझ्याकडून सतत अपेक्षा करत होते. प्रसिद्धी मिळाल्यानंतर मला गुदमरल्यासारखं वाटतं, बाजपेयी म्हणाले.

हेही वाचा- “तू वजन कमी कर”; वजनावरुन एका पत्रकाराने विद्या बालनला दिला होता सल्ला, अभिनेत्री म्हणाली…

मनोज बाजपेयी यांचा “सिर्फ एक बंदा काफी है” हा आगामी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाट्यात सापडला आहे. आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा आसाराम बापूंची कथा असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. तो पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीची केस लढत आहे. जिच्यावर एका भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा एक खटला मनोज एकट्याने लढत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्याची या प्रकरणात दोषीला शिक्षा मिळवून देण्यासाठीची चाललेली धडपड दाखवण्यात आली आहे.