ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. सध्या ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी खूप कमी चित्रपटात काम केले आहे. नुकतंच त्यांनी मी सिनेसृष्टीत मागे का पडलो, याबद्दल भाष्य केले आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी नुकतंच एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, “मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना २० वर्षांचा होतो. त्यावेळी मला स्वत:वर अतिआत्मविश्वास होता. त्यावेळी मला वाटलं की मी खूप चांगलं काम करत आहे. मला प्रमुख भूमिकांसाठी विचारणा का केली जात नाही, कारण मी तो अधिक चांगल्यारितीने करु शकतो, असे मला कायमच वाटायचे.”
आणखी वाचा : “पिलू फक्त माझ्या मुलाची आई नव्हती”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, म्हणाले “दुसऱ्या लग्नाचा…”
“मी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर माझा हा विश्वास हळूहळू कमी झाला. मला माझ्या अभिनयावर असलेल्या अतिआत्मविश्वासामुळेच अभिनेता म्हणून माझा घात झालामाझ्या अतिआत्मविश्वासाने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना मी माझा जवळचा मित्र आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेता ओम पुरी यांना भेटलो. त्यावेळी ओम पुरी हे खूप घाबरलेले असायचे. ते थोडे चिंताग्रस्त, लाजाळू आणि अंतर्मुख स्वभावाचे होते.” असेही त्यांनी सांगितले.
“ओम पुरी तेव्हा अलीगढ विद्यापीठात परफॉर्म करायचे. त्यानंतर ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आले. ते दोघेही एकत्र नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये काम करत असताना नसीरुद्दीन यांच्या लक्षात आले की गेल्या ३ वर्षात ओम किती पुढे गेला आहे. नसीरुद्दीन यांच्यासाठी हा विचार खूपच त्रासदायक होता. कारण जेव्हा मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आला तेव्हा जिथे होतो, तिथेच मी अजूनही आहे, असे मला वाटायचे.” असेही तो म्हणाला.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
“मी जेव्हा इथे आलो तेव्हाही असाच अभिनय करायचो, मग मी इथे येऊन नवीन काय शिकलो? आता मी काय करणार? मी माझी भाकरी कमावण्यासाठी कुठे जाणार? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानंतर ओम हा दिल्लीत गेला. मी त्यानंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले. माझ्यानंतर त्यांना चित्रपटात काम मिळण्यास सुरुवात झाली. या टप्प्यानंतर मला कधीही वाटले नाही की मी आतापर्यंत अगदी सहजतेने कोणत्याही प्रकल्प केलेला नाही, जे ओमला जमले”, असेही नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले.